अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 06:46 PM2021-07-12T18:46:56+5:302021-07-12T18:51:53+5:30

Ashish Shelar Bjp Sangli : मिरजेच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. लवकरच याप्रश्नी भाजप सीबीआयकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आ. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Apex death case to be taken to CBI: Ashish Shelar | अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार

अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार

Next
ठळक मुद्देअ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलारदबावतंत्र चालू देणार नाही, भाजप प्रसंगी न्यायालयात जाईल

सांगली : मिरजेच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. लवकरच याप्रश्नी भाजप सीबीआयकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आ. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

शेलार म्हणाले की, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांची याप्रकणी भूमिका संशयास्पद आहे. या रुग्णालयाच्या परवानगीपासून अनेक गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत, अशी माहिती मला भाजप कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. दुसरीकडे हे प्रकरण दाबण्याच्या दृष्टीने पत्रकारांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्याचा भाजपच्यावतीने आम्ही निषेध करीत आहोत. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही.

भाजपने हे प्रकरण बाहेर काढले असून ते तडीस नेऊ. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार होतो, मात्र विधानसभा चालू दिली नाही. आता हे प्रकरण आम्ही सीबीआयकडे नेणार आहोत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागू. यात जे कोणी दोषी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. या सरकारने व त्यांच्या जिल्ह्यातील मंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवे. केवळ गैरनियोजनामुळे रुग्ण, मृत्यूसंख्या वाढत आहे. लोकांच्या जिवाचा हा प्रश्न असल्याने सरकारने याबाबतीत गांभिर्याने पावले टाकावीत.

जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणाबद्दल ते म्हणाले की, पक्षाचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. मत मांडण्यामुळे पक्षात फार मोठी गटबाजी आहे, असा अर्थ घेऊ नये.

संभाजीराजेंना आमचा पाठींबाच

छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे. ते आमचे राजे आहेत. समाजाच्या आरक्षणप्रश्नी ते जे भूमिका घेतील, त्याला आमचे सहकार्य राहील, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

आरक्षण घालविण्यामागे वोट बँकेचा अजेंडा

मराठा समाजाचे आरक्षणप्रश्नी ठाकरे सरकारची भूमिका चुकीची आहे. भाजपला श्रेय मिळू नये व त्यांची वोट बँक सुरक्षित रहावी, असा त्यामागे छुपा अजेंडा होता, अशी टीका शेलार यांनी यावेळी केली.

Web Title: Apex death case to be taken to CBI: Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.