मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:35+5:302021-09-10T04:32:35+5:30

सांगली : गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांच्या कालावधीत नागरिकांनी मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन ...

Appeal to be careful when buying sweets and dairy products | मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन

मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन

Next

सांगली : गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांच्या कालावधीत नागरिकांनी मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले की, मिठाई व दुधाचे पदार्थ ताजे असल्याची खात्री करूनच घ्यावेत. बिल घ्यावे. उघड्यावरील मिठाई, खवा, फेरीवाल्यांकडून खरेदी करू नये. माव्याचे पदार्थ २४ तासांत खाऊन संपवावेत. बंगाली व तत्सम मिठाई आठ तासांत संपवावी. मिठाईवर बुरशी दिसल्यास किंवा खराब झाल्याचे आढळल्यास टाकून द्यावी. पॅकिंगवर उत्पादकाचा पत्ता, पॅकिंग दिनांक व बेस्ट वापर दिनांक पाहूनच खरेदी करावी. दुकानात आरोग्यविषयक काळजी घेतली जात असल्याचे पाहावे. मिठाई उत्पादकांनी तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर करण्यापूर्वी टीपीसी मीटरने पोलर कंम्पाॅड तपासणी करावी. २५ हून अधिक कंम्पाॅड आढळल्यास खाद्यतेल पुन्हा वापरू नये. ग्राहकांनी शंका किंवा तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८०० २२२३६५ वर संपर्क साधावा.

Web Title: Appeal to be careful when buying sweets and dairy products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.