विसर्ग वाढण्याच्या शक्यतेने सतर्क राहण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:31+5:302021-07-30T04:28:31+5:30
सांगली : धरणामध्ये असलेला पाणीसाठा व हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाणी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग ...
सांगली : धरणामध्ये असलेला पाणीसाठा व हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाणी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुरू असलेल्या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीव विसर्गामुळे कृष्णा नदीच्या सध्याच्या पाणीपातळीत १ ते २ फुटांची वाढ होऊ शकते. त्यामुळे सांगलीत आयर्विन पूल येथील पाणीपातळी ४० ते ४२ फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत कोयना धरण ८६ टक्के भरले असून, ४८ हजार ९३१ क्युसेक विसर्ग होत आहे. धोम धरण ७९ टक्के भरले असून, ३ हजार ५९४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कण्हेर धरण ७९ टक्के भरले असून, ४ हजार ९४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरण ७५ टक्के भरले असून, २ हजार ९१९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीपातळीत पाणी वाढण्याची शक्यता असल्याने या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.