सांगलीत दिवाळीसाठी ‘माणुसकीची भिंत’, कपडे, फराळ साहित्य जमा करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 07:54 PM2017-10-15T19:54:17+5:302017-10-15T19:54:32+5:30
गरीब, श्रीमंत, लहान आणि मोठा असे सर्व मतभेद विसरून सा-यांच्या आयुष्यात प्रकाशोत्सवाचे रंग भरणा-या दिवाळीचा आनंद गरजू कुटुंबांनाही मिळावा...
सचिन लाड
सांगली : गरीब, श्रीमंत, लहान आणि मोठा असे सर्व मतभेद विसरून सा-यांच्या आयुष्यात प्रकाशोत्सवाचे रंग भरणा-या दिवाळीचा आनंद गरजू कुटुंबांनाही मिळावा या उद्देशाने सांगलीत माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
माणुसकीचे दर्शन घडविणा-या या उपक्रमात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतचे कपडे, फराळ व अन्य दिवाळीसाठी आवश्यक सर्व साहित्य जमा केले जात आहे. हे जमा झालेले साहित्य गरजूंना वाटप करुन त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले जाणार आहे.
गोरगरिबांची दिवाळी आनंंदाने साजरी व्हावी, त्यांना किमान जुने-नवे कपडे कपडे मिळावेत, या उद्देशाने माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, कवलापूर (ता. मिरज) येथील डॉ. अमोल कोळी यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. वापरात नसलेले चांगले कपडे गरजूंसाठी जमा केले जात आहे. स्वच्छ धुऊन इस्त्री केलेल्या कपडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांचे कपडे, साड्या, पॅन्ट, शर्ट, ब्लॅन्केट, शाल, स्वेटर्स, असे विविध प्रकारचे साहित्य जमा करुन घेतले जात आहे. जमा झालेले हे
कपडे गरजू महिला, पुरुष व लहान मुलांना वितरीत केले जाणार आहे.
कपडे, दिवाळीचा फराळ, शालोपयोगी साहित्य युनूस महात (फौजदार गल्ली), मुश्ताकमुजावर (पंचशीलनगर, कॉलेज कॉर्नर), कौस्तूभ कुलकर्णी (दांडेकर हॉलसमोर, विश्रामबाग), प्रशांत भोसले, सोनू गवळी, जितेंद्र पत्की (पंचशीलनगर), सुजीत माळी (चिंतामणीनगर) राहूल वाले (संजयनगर), सागर मुळे (हळद भवन), सम्राट टेलर (पंचमुखी मारुती रस्ता, सांगली), विजय अपराध (संजीवनी लॅब, माधवनगर, ता. मिरज), अमित मालाणी, वैभव चौगुले, निखील जाधव (सांगली), डॉ. अमोल कोळी (धन्वंतरी क्नि यांच्याकडे साहित्य जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. हे सर्व
साहित्य अनाथाश्रम, वृद्धाश्रम व गरजू कुटूंबांना वाटप केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ अमोल कोळी ७०२०४६३००३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनसंयोजकांनी केले आहे.
दिवाळीदिवशी वाटप
गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात साड्या, पॅन्ड, शर्ट, लहान मुलांचे कपडे, शालोपययोगी साहित्य, फराळ मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या कपड्यांची वर्गवारी करण्याचे काम सुरु आहे. दिवाळीच्या पहिल्यादिवशी कपडे व फराळाचे वाटप
केले जाणा आहे. आता थंडीचा महिना सुरु होणार असल्याने काहीजणांनी स्वेटर, शाल व चादरही दिल्या आहेत.