आरटीईअंतर्गत ३० जूनपर्यंत शाळेत प्रवेश निश्चितीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:03+5:302021-06-11T04:19:03+5:30
सांगली : शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी विष्णू ...
सांगली : शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी केले.
२०२१-२२ या वर्षासाठी आरटीईचे प्रवेश यापूर्वीच निश्चित झाले आहेत. त्यासाठी ७ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये पालकांच्या अर्जानुसार प्रवेश देण्यात आले आहेत. निवड यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्याचे प्रवेश ३० जूनपर्यंत प्रत्यक्ष शाळेत जाऊन निश्चित करायचे आहेत. मोबाईलवर मेेसेज आल्यावर किंवा पोर्टलवर दिलेल्या वेळेत मूळ कागदपत्रांसह पालकांनी शाळेत जायचे आहे. कागदपत्रांच्या छाननीपूर्वी प्रवेश तात्पुरता निश्चित करायचा आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष शाळेत जाता येत नसल्यास मेल, व्हाॅटस्ॲप किंवा दूरध्वनीवरून प्रवेश निश्चिती करावी. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी शाळेत जाऊ नये, असे कांबळे म्हणाले. उर्वरित रिक्त जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार मेसेजद्वारे कळविल्या जाणार आहेत. शाळेत जाताना रहिवासी पुरावा, जन्माचा दाखला, जातीचा व उत्पन्नाचा दाखला न्यायचा आहे.