नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:29+5:302021-07-23T04:17:29+5:30
सांगली : गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढत आहे. कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची ...
सांगली : गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढत आहे. कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची पातळी शुक्रवारी सकाळपर्यंत अंदाजे ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले. अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले.
--------
गावभागातून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील गावभाग परिसरात घरासमोर लावलेली १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याप्रकरणी संतोष बापू वनकुंद्रे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. जीन्स व रेनकोट, तोंडाला रुमाल बांधलेल्या व्यक्तीने दुचाकी चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
----
यशवंतनगर येथून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील यशवंतनगर येथील चिन्मय आर्केडमधून अज्ञाताने ५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी रत्नाकर माणिकराव शिंदे यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. संजयनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.