डाेंगरवाडीच्या माळावर फुलली सफरचंदाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:18+5:302021-03-10T04:27:18+5:30

फाेटाे : बागेचा फाेटाे येणार आहे. विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील सेवानिवृत्त एस. ...

An apple orchard on the hill of Dangarwadi | डाेंगरवाडीच्या माळावर फुलली सफरचंदाची बाग

डाेंगरवाडीच्या माळावर फुलली सफरचंदाची बाग

Next

फाेटाे : बागेचा फाेटाे येणार आहे.

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील सेवानिवृत्त एस. टी. वाहकाने डोंगरवाडीच्या माळरानातील बारा गुंठे क्षेत्रावर सफरचंदाची बाग फुलवली आहे. या अनोख्या प्रयोगाची परिसरात जाेरदार चर्चा आहे.

देववाडीतील विजय सर्जेराव खोत यांची वाळवा तालुक्यातील डाेंगरवाडीच्या माळावर थाेडीफार शेती आहे. एस. टी.च्या सेवेत असतानाही ते शेतात वेगवेगळे प्रयोग करत. उसाशिवाय केळी, शेवगा, पपई, गुलाब फुले अशी वेगवेगळी उत्पादने त्यांनी घेतली आहेत. तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर त्यांची प्रयोगशीलता आणखी बहरली.

सोशल मीडियावरून माहिती घेऊन त्यांनी हिमाचल प्रदेश गाठले. विलासपूर येथील सफरचंदाची बाग पाहून वर्षापूर्वी त्यांनी चार वेगवेगळ्या जातींची १७५ रोपे २०० रुपयांप्रमाणे खरेदी केली. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी डोंगरवाडीजवळ १२ गुंठे क्षेत्रावर रोपांची लागवड केली. यातील १२५ रोपे अतिशय चांगल्या प्रकारे वाढली आहेत. पाणी अतिशय कमी लागत असल्यामुळे व्याप कमी आहे. जूनमध्ये झाडांची छाटणी केल्यामुळे आता आलेल्या फुटव्यांना फूलकळी पडली आहे. त्यातील काही झाडांना फळे लागली आहेत.

वर्षभरातच झाडांना फळे आली आहेत, याचा अर्थ येथील वातावरण या पिकाला पोषक आहे. पुढील वर्षी फळांची संख्या बघून क्षेत्र वाढवणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

काेट

छंद म्हणून शेतात वेगवेगळे प्रयोग करतो. उत्पन्न किती मिळेल, याचा कधी विचार केलेला नाही. मात्र, सफरचंदाची लागवड आपल्या भागात यशस्वी होत आहे. बागेत औषध, खताचा खर्च शून्य आहे.

- विजय खोत

Web Title: An apple orchard on the hill of Dangarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.