कर्जमाफीसाठी तीन लाखावर अर्ज-- कुटुंबांची संख्या दीड लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:25 AM2017-09-15T00:25:48+5:302017-09-15T00:28:18+5:30

 Application for loan application for three lakh - Number of families in one and a half lakhs | कर्जमाफीसाठी तीन लाखावर अर्ज-- कुटुंबांची संख्या दीड लाखावर

कर्जमाफीसाठी तीन लाखावर अर्ज-- कुटुंबांची संख्या दीड लाखावर

Next
ठळक मुद्देअर्जासाठी आज शेवटचा दिवस; रात्री बारा वाजेपर्यंत नोंदणी होणारएखाद्याचा अर्ज नामंजूर झाला, तर त्याला प्रांतस्तरीय कमिटीकडे अपील करता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कर्जमाफी व सवलतीसाठी शेतकºयांनी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी १५ सप्टेंबरला संपणार असल्याने, जिल्हाभर धावाधाव सुरू झाली आहे. इंटरनेटच्या गोंधळाचा फटकाही शेतकºयांना बसत आहे. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३ लाख ११ हजार वैयक्तिक अर्ज दाखल झाले होते.

कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रिकरणानंतर अर्जांची संख्या १ लाख ६0 हजारावर गेली आहे. शेतकºयांसाठी कर्जमाफी व नियमित कर्जदारांना अनुदान योजना जाहीर करुन अडीच महिने पूर्ण झाले आहेत. त्यासाठी कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावा लागत आहे. अर्ज भरण्याची सोय सेतू केंद्रात करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेच्या अडचणी आहेत. पूर्ण क्षमतेने इंटरनेट कनेक्शन मिळत नसल्याने गतीने नोंदणी होत नाही. कर्जमाफी अर्जासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आता एकच दिवस शिल्लक आहे.

राज्य शासनाच्या कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५७ हजार शेतकरी पात्र आहेत. अर्जांच्या आकडेवारीत असलेला गोंधळ हा एकाच कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळे अर्ज भरल्यामुळे झाला आहे. तरीही हे अर्ज एकत्र होणार असल्याने आकडे चुकणार नाहीत. जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३ लाख ११ हजार अर्ज दाखल झाले होते. यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी केलेल्या अर्जांचा समावेश आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील विविध सदस्यांचे अर्ज कुटुंब म्हणून एकत्र केले जात आहेत. अशा कुटुंबांच्या अर्जांची संख्या आता १ लाख ६0 हजार इतकी झाली आहे.

रात्रीपर्यंत नोंदणी
कर्जमाफी, सवलत आणि अनुदानासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी अंतिम मुदत असल्याने शेतकºयांची पळापळ सुरू आहे.
त्यांना शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज दाखल करताना संबंधित यंत्रणा रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करून घेऊ शकते.गेल्या काही दिवसांपासून सेतू व खासगी इंटरनेट कॅफे चालकांनी लोकांच्या सोयीसाठी गर्दीच्यावेळी रात्री उशिरापर्यंत नोंदी करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अंतिम मुदतीत अर्ज नोंदणीचे कामही रात्री उशिरापर्यंत चालू शकते.

काय होणार पुढे...
अर्ज दाखल झाल्यानंतर बँकांकडील व अर्जदारांकडील आधार कार्ड जुळविले जाणार आहे. त्यानंतर तयार केलेली अर्जदारांची यादी तालुकास्तरीय समितीकडे सुपूर्द केली जाईल. ही समिती संबंधित अर्जदारांबाबत खातरजमा करतानाच गावपातळीवर याद्या लावल्या जातील. त्यामुळे लोकांनाही त्याची कल्पना येईल. कोणी आक्षेप घेतला, तर त्याबाबतही तपासणी होईल. तालुकास्तरावरच अर्ज मंजूर केले जाणार आहेत. एखाद्याचा अर्ज नामंजूर झाला, तर त्याला प्रांतस्तरीय कमिटीकडे अपील करता येणार आहे. त्यानंतर संबंधित कमिटी पात्र किंवा अपात्रतेचा अंतिम निर्णय घेईल. जिल्हाधिकारी स्तरावरील कमिटी या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार आहे.

कनेक्टिव्हिटीला अडथळा
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना, शासनाचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारपासून अर्ज भरण्यासाठी कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक केंद्रांतील कामकाज बंद आहे. मुदतवाढीबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने, अर्ज डाऊनलोड न झाल्यास जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

अर्जासाठी मुदतवाढ द्या : दिलीपतात्या पाटील
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेच्या अडचणी आहेत. पूर्ण क्षमतेने इंटरनेट कनेक्शन मिळत नसल्याने नोंदणी गतीने होत नाही. कर्जमाफी अर्जासाठी शुक्रवारी शेवटची मुदत आहे. पण जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना अद्याप अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहतील. कर्जदार शेतकºयांवर अन्याय होणार नाही, याबाबतची दक्षता घेऊन शासनाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, यासाठी सहकार विभागाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सांगितले.

Web Title:  Application for loan application for three lakh - Number of families in one and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.