पालिका क्षेत्रात कृषी योजना लागू करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:53 PM2017-08-27T23:53:29+5:302017-08-27T23:53:29+5:30

Applying agricultural scheme in the municipality area | पालिका क्षेत्रात कृषी योजना लागू करु

पालिका क्षेत्रात कृषी योजना लागू करु

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय आपण घेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
कडेगाव येथे लिबर्टी गणेश मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, तहसीलदार अर्चना शेटे, आरोग्य अधिकारी डॉ. पत्की, तालुका कृषी अधिकारी पिंजारी, मुख्याधिकारी चरण कोल्हे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख प्रमुख उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, मुख्यमंत्री पेयजल योजनेचे राज्याचे ५०० कोटींचे बजेट आहे. त्यापैकी आपण आणि संग्रामसिंह देशमुख दोघांनी प्रयत्न करून २५० कोटी रुपये सांगली जिल्ह्यासाठी आणले आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कडेगाव शहराचा आणि तालुक्याचा भरघोस विकास केला जाईल. शासनाच्या विविध योजना या ठिकाणी राबविल्या जातील. कडेगाव दारूबंदीसाठी राज्यपातळीवर याबाबत सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शासनाच्या विविध योजनांचे पत्रक राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते महिला व ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच कडेगाव दारूबंदीसाठी अधिकारी वर्ग जुमानत नसल्याच्या तक्रारी महिला वर्गाकडून करण्यात आल्या. त्याबाबतचे निवेदन महिलांच्यावतीने मंत्री खोत यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, डॉ. पत्की यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, नगरसेवक हाजी शौकत पटेल, नगरसेविका शांता घाडगे, अश्विनी वेल्हाळ, सिंधू रास्कर, युवा नेते धनंजय देशमुख, सुरेश यादव, श्रीजय देशमुख, रवी पालकर, हनीफ आत्तार, अश्रफ तांबोळी, संदीप गायकवाड उपस्थित होते.
दारुबंदीचा प्रश्न मार्गी लावणार
यावेळी खोत म्हणाले की, कर्जमाफी देण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि त्यानंतर आणखी शेतकरी कर्जमाफी अर्ज भरण्यास वंचित राहिले, तर शेवटचा शेतकरी अर्ज भरेपर्यंत १५ सप्टेंबरनंतरही आणखी मुदतवाढ देण्यात येईल. कडेगावातील महिलांनी समाजाला व्यसनापासून दूर ठेवण्याचा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला आहे. महिलांचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. दारूबंदीसाठी संबंधित अधिकाºयांशी चर्चा करू आणि दारूबंदीबाबत आदेश देऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले.

Web Title: Applying agricultural scheme in the municipality area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.