नव्वद चौरस मीटरपर्यंतच्या घरांना एक टक्का जीएसटी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:18 PM2019-05-12T23:18:34+5:302019-05-12T23:18:38+5:30
मिरज : घरांसाठी ९० चौरस मीटरच्या आत व मुंबईसह सहा महानगरात ६० चौरस मीटरच्या आत व ४५ लाख मूल्यांकनापेक्षा ...
मिरज : घरांसाठी ९० चौरस मीटरच्या आत व मुंबईसह सहा महानगरात ६० चौरस मीटरच्या आत व ४५ लाख मूल्यांकनापेक्षा कमी किमतीच्या निवासी घरांसाठी जीएसटीत १ टक्क्यापर्यंत कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून छोट्या घरांसाठी १ टक्का व त्यावरील जादा किमतीच्या घरांसाठी ५ टक्के जीएसटी दराची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने परवडणाऱ्या घरांसाठी जीएसटीचे नवीन दर अधिसूचित केले आहेत. १ एप्रिलपासून कमी किमतीच्या घरांसाठी प्रभावी दर १ टक्का, इतर निवासी घरांवर ५ टक्के, तर दुकाने व कार्यालयांसाठी १२ टक्के कर भरावा लागणार आहे. नवीन कर आकारणीचा लाभ घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना रोख स्वरुपात कर भरावा लागेल.
१२ टक्के दराने जीएसटी भरणाºया बांधकाम व्यावसायिकांना सळई, सिमेंट, मजुरी व बांधकाम साहित्यावरील भरलेल्या कराचा परतावा मिळणार आहे. नवीन दराचा लाभ घेणारे व्यावसायिक कर परतावा घेण्यास पात्र असणार नाहीत.
अधिसूचनेतील तरतुदीनुसार १ एप्रिल २०१९ रोजी चालू असलेल्या गृह प्रकल्पाच्या बाबतीत, नोंदणीकृत बांधकाम व्यावसायिक नवीन १ व ५ टक्के या दरानेच जीएसटीचा भरणा करू शकतात किंवा जुन्या १२ व ८ टक्के दराने जीएसटी भरण्याचा पर्याय वापरू शकतात. जुन्या दराचा पर्याय स्वीकारणारे व्यावसायिक परतावा घेण्यास पात्र राहतील; मात्र त्य़ांनी कोणता पर्याय निवडला, हे दि. २० मे पर्यंत जीएसटी विभागास कळविणे आवश्यक आहे. जीएसटी दराचा पर्याय न निवडल्यास नोंदणीकृत व्यावसायिकांना निवासी घरांवर १ व ५ टक्के दरानेच भरणा करावा लागेल.
निवासी संकुलांतील व्यापारी गाळ््यांबाबत नियम
दि. १ एप्रिल २०१९ नंतर चालू होणाºया प्रकल्पाच्या बाबतीत मात्र, बांधकाम व्यावसायिक नवीन १ व ५ टक्के दरानेच जीएसटीचा भरणा करू शकणार आहेत. निवासी संकुलात १५ टक्के व्यापारी गाळे असल्यास अशा व्यावसायिक क्षेत्रासाठी १५ टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.