सांगली अर्बन बँकेवर व्यवस्थापन मंडळाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:22+5:302021-07-08T04:18:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली अर्बन बँकेकडून व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. नारायण बोर्गीकर, श्रीपाद चितळे व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली अर्बन बँकेकडून व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. नारायण बोर्गीकर, श्रीपाद चितळे व अशोक सावंत यांची व्यवस्थापन मंडळावर वर्णी लागली. संचालक मंडळाच्या सभेत या निवडी करण्यात आल्या.
रिझर्व्ह बँकेने १०० कोटी व त्यावरील ठेवी असणाऱ्या बँकांनी व्यवस्थापन मंडळ नियुक्त करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यात आले. नारायण रामचंद्र बोर्गीकर हे ३४ वर्षांपासून सहकारी बँकेतील व्यवस्थापन पदावर काम करत आहेत. त्यांनी नागरी बँका व सहकारी पतसंस्थेवर सल्लागार म्हणूनही काम केले आहे. श्रीपाद परशुराम चितळे हे भिलवडी येथील बी. जी. चितळे डेअरी फर्मचे वरिष्ठ भागीदार आहेत. अशोक विजयसिंह सावंत हे इन्फोसावंत टेक्नॉलॉजी लि.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यावेळी बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, उपाध्यक्ष एच. वाय. पाटील, संचालक अ. वा. मानवी, श्रीपाद खिरे, संजय धामणगावकर, संजय पाटील, कालिदास हरिदास, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर उपस्थित होते.