डीएड, बीएडधारकांना १५ हजार मानधनावर नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:58 PM2024-11-27T12:58:16+5:302024-11-27T12:58:40+5:30
सांगली : डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. दहापेक्षा कमी ...
सांगली : डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत या नियुक्त्या होतील.
यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने १० डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत. खुल्या वर्गासाठी १८ ते ३८ वर्षे वयोगटांतील उमेदवार पात्र आहेत. मागासवर्गीयांमध्ये वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत पात्र असेल. ज्या शाळेत नियुक्ती होणार असेल, तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील.
त्यानंतर, तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाणार आहे. ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. तिला मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल. नियुक्त उमेदवारांना प्रतिमहिना १५ हजार रुपये मानधन मिळेल. या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी ही माहिती दिली.