काेरोनाग्रस्त शिक्षकांना कर्तव्य कालावधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:25+5:302021-03-21T04:25:25+5:30
सांगली : कर्तव्य बजावत असताना कोरोनाग्रस्त झालेल्या शिक्षकांच्या उपचार कालावधीत त्यांची रजा बिनपगारी टाकण्यात आली होती. कर्तव्य कालावधी म्हणून ...
सांगली : कर्तव्य बजावत असताना कोरोनाग्रस्त झालेल्या शिक्षकांच्या उपचार कालावधीत त्यांची रजा बिनपगारी टाकण्यात आली होती. कर्तव्य कालावधी म्हणून या रजेला मंजुरीची मागणी करण्यात आली होती. त्यास आयुक्त नितीन कापडणीस यांनी मान्यता दिली.
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने यासाठी पाठपुरावा केला होता. कर्तव्यावर असताना पॉझिटिव्ह झालेल्या शिक्षकांच्या उपचाराचा कालावधी कर्तव्य कालावधी करण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात सांगली-मिरज-कुपवाड महापालिका शाळांतील शिक्षकांना आरसीएच येथे डाटा एन्ट्रीसाठी प्रतिनियुक्ती तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेअंतर्गत कुटुंब सर्वेक्षण आदी कामे देण्यात आली होती. हे कर्तव्य पार पाडत असताना काही शिक्षक कोरोना संक्रमित झाले. त्यांचा उपचाराचा कालावधी हा शिक्षण विभागाकडून बिनपगारी केला गेला.
नगरपालिका, महापालिका शिक्षक संघांचे अध्यक्ष गजानन मोरलवार, सरचिटणीस चंद्रशेखर राऊत, जगदीश भोंडेकर, गुरु बगले, मंजुषा सूर्यवंशी, मनीषा थोरात व अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कापडणीस यांच्याकडे दाद मागितली. माजी आमदार शरद पाटील यांनीही संघटनेसोबत आयुक्तांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी सर्व शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचा रजा कालावधी हा कर्तव्य कालावधी संबोधून सर्व ९ शिक्षकांना न्याय दिला.