वाद पेटणार; सोलापुरातील शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा पुन्हा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 06:03 PM2021-09-23T18:03:35+5:302021-09-23T18:03:43+5:30

वाद पेटणार : इच्छुकांची सुरू झाली आतापासून मोर्चेबांधणी

To argue; Congress eye on Solapur city north assembly constituency again | वाद पेटणार; सोलापुरातील शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा पुन्हा डोळा

वाद पेटणार; सोलापुरातील शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा पुन्हा डोळा

Next

सोलापूर : जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच काँग्रेस व राष्ट्रवादीत एक नवा वाद समोर आला आहे. काँग्रेसने शहर उत्तर विधानसभेच्या जागेवर पुन्हा आपला हक्क सांगितला आहे.

जिल्हा काँग्रेसचा नुकताच मेळावा झाला. या मेळाव्याला शहरातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेसची नव्याने बांधणी करण्याचे जाहीर केले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रामहरी रुपनवर यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येत आहे असे पाहून शहर उत्तरच्या जागेचा मुद्दा उपस्थित केला. केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये क्षमता नसल्याने यापूर्वी आपल्या नेत्यांना हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून द्यावा लागला. निवडणुकीआधी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करताना एकानेही धाडस दाखविलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ सोडावा लागला. त्या बदल्यात काँग्रेसला काहीही मिळालेले नाही. आता काँग्रेस या मतदारसंघात नव्याने उभारी घेत आहेत. त्यामुळे आपला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेऊ असे जाहीर केले आहे.

शहर उत्तरमध्ये महापालिका निवडणुकीचे औचित्य साधून अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, यंग ब्रिग्रेडचे प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, माजी अध्यक्ष सुधीर खरटमल, राजन कामत, सुनील रसाळे यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. अशात प्रदेश उपाध्यक्षांच्या जाहीर वक्तव्याने हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रदेश पातळीवर चर्चा होऊन ‘शहर उत्तर’बाबत निर्णय झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोनवेळा या मतदारसंघात निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघावर हक्क सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीवेळी पाहू.

भारत जाधव, राष्ट्रवादी शहर, अध्यक्ष

 

प्रदेश उपाध्यक्ष शहर उत्तरच्या जागेबाबत बोलले असतील. प्रदेश पातळीवर या विषयावर चर्चा झाली असावी. सध्या आम्ही महापालिका निवडणुकीच्या कामात लक्ष घातले आहे. त्यामुळे हा विषय माझ्यासमोर चर्चेला आला नाही. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असल्याने अपेक्षा असणार आहे.

प्रकाश वाले, काँग्रेस शहर, अध्यक्ष

Web Title: To argue; Congress eye on Solapur city north assembly constituency again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.