घराचा ताबा सोडण्यावरुन वाद, मिरजेत वकील महिलेचे घर पेटविले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 05:46 PM2023-04-11T17:46:33+5:302023-04-11T17:47:51+5:30

घराचा कब्जा घेण्यासाठी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून केला आत प्रवेश

Argument over relinquishment of house, lawyer woman house set on fire in Miraj Sangli District | घराचा ताबा सोडण्यावरुन वाद, मिरजेत वकील महिलेचे घर पेटविले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

घराचा ताबा सोडण्यावरुन वाद, मिरजेत वकील महिलेचे घर पेटविले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

मिरज : मिरजेत घराचा ताबा सोडण्यासाठी कुपवाड रस्त्यावर महिलेचे घर पेटविण्यात आले. याप्रकरणी ॲड. प्रवीणा हेटकाळे यांनी सोनी सॅम नायनन, अजित जेठानंद अडवाणी व हाशिम मणेर या तिघांविरुद्ध गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हेटकाळे यांनी गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रवीणा हेटकाळे या मेनायतील सॅम्युअल नायनन यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यांच्यात राहते घरखरेदीचा करार झाला होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सोनी सॅम नायनन याने घर रिकामे करण्यासाठी हेटकाळे यांच्याकडे तगादा लावला.

त्यानंतर सांगलीतील एका पतसंस्थेचे अध्यक्ष अजित जेठानंद अडवाणी यांनी ‘तुम्ही राहत असलेल्या घरावर कर्ज आहे, ते घराचा लिलाव करायचा आहे, तुम्ही राहत असल्याने घराला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे घर रिकामे करा, नाहीतर दीड कोटी रुपयांना घर खरेदी करा’ असे धमकावले. त्यामुळे अडवाणी यांच्याविरुद्ध हेटकाळे यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

या रागातून सोनी नायनन, अजित अडवाणी व हाशिम मणेर या तिघांनी घराचा कब्जा घेण्यासाठी सोमवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील प्रापंचिक साहित्य पेटविण्यात आले. गॅस सिलिंडर, शेगडी व बोअरची मोटर असे १५ हजाराचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार आहे. याबाबत गांधी चौक पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Argument over relinquishment of house, lawyer woman house set on fire in Miraj Sangli District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.