विनामास्क तरुणांकडून पोलिसांशी वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:03 AM2020-12-05T05:03:19+5:302020-12-05T05:03:19+5:30

सांगली : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची माेहीम सुरू असताना, माधवनगर जकात नाक्याजवळ काही तरुणांनी पोलिसांशी वाद घातला. गेल्या काही दिवसांपासून ...

Argument with police by unmasked youth | विनामास्क तरुणांकडून पोलिसांशी वाद

विनामास्क तरुणांकडून पोलिसांशी वाद

Next

सांगली : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची माेहीम सुरू असताना, माधवनगर जकात नाक्याजवळ काही तरुणांनी पोलिसांशी वाद घातला.

गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून तपासणी मोहीम सुरू आहे. माधवनगर जकात नाक्यावर दररोज अशाप्रकारची तपासणी मोहीम राबविण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मास्कची शिस्त लागावी म्हणून कारवाई करण्यात येत आहे. तरीही विनामास्क फिरणाऱ्या तरुणांकडून पोलिसांशी वाद घातला जातो. माधवनगर जकात नाक्याजवळ बुधवारी सकाळी अशाचप्रकारचा वाद काही तरुणांनी घातला. हनुवटीवर मास्क असलेल्या लोकांकडून अधिक वाद घातला जात आहे. मास्क असूनही कारवाई का करीत आहात, अशी विचारणा केली जात आहे, वास्तविक मास्क तोंडाला लावण्याचा नियम आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा लोकांवरही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. शहरात अनेकजण मास्क हनुवटीवर लावून फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.

Web Title: Argument with police by unmasked youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.