माराेळीच्या जंगलात अडवून तिघांवर सशस्त्र हल्ला, तलवारीने हात-पाय ताेडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 01:30 PM2022-03-28T13:30:03+5:302022-03-28T13:31:06+5:30

जंगलात दबा धरून बसलेल्या हल्लेखाेरांनी भावकीतील अंतर्गत वाद व शेतजमिनीवरून सुरू असलेल्या संघर्षातून हा हल्ला केल्याचे समाेर येत आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

Armed assault on three persons, who were trapped in the forest of Maroli sangli | माराेळीच्या जंगलात अडवून तिघांवर सशस्त्र हल्ला, तलवारीने हात-पाय ताेडले

माराेळीच्या जंगलात अडवून तिघांवर सशस्त्र हल्ला, तलवारीने हात-पाय ताेडले

Next

जत : माराेळी (ता. मंगळवेढा) येथील वनक्षेत्रात जाडरबाेबलाद (ता. जत) येथील दाेघा भावांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. तलवारीने वार करीत हात-पाय ताेडण्यात आले. जंगलात दबा धरून बसलेल्या हल्लेखाेरांनी भावकीतील अंतर्गत वाद व शेतजमिनीवरून सुरू असलेल्या संघर्षातून हा हल्ला केल्याचे समाेर येत आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

जखमींमध्ये विठ्ठल रामचंद्र बरूर, दयानंद मल्लेशप्पा बरूर व महादेव रामचंद्र बरूर (तिघेही, रा. जाडरबाेबलाद) यांचा समावेश आहे. त्यांना उपचारार्थ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील माराेळी व जत तालुक्यातील जाडरबाेबलाद दरम्यान वन विभागाची जागा आहे. जंगल असल्याने नेहमीच हा परिसर निर्जन असताे. जाडरबाेबलाद येथील बरुर भावकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविवारी विठ्ठल बरूर, दयानंद बरूर व महादेव बरूर हे तिघे एकाच दुचाकींवरून जाडरबोबलाद जवळच असणाऱ्या नंदूर येथे एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले हाेते.

अंत्यविधी आटाेपून परत येत असताना वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांना अडवून तलवारीने हल्ला चढविला. त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उमदी व मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलीस ठाण्यात याची नोंद नव्हती.

जमिनीचा वाद

हल्लेखाेरांचा जखमींबरोबर मागील काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांच्यात शेतात नांगर लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या कारणावरूनच ही घटना घडली असावी असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला.

Web Title: Armed assault on three persons, who were trapped in the forest of Maroli sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.