पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर, एनडीआरएफचे पथक कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:27+5:302021-07-26T04:25:27+5:30

सांगली : पुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत. याशिवाय लष्करी जवानांच्या एका पथकासह त्यांचे ...

Army, NDRF team working to help flood victims | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर, एनडीआरएफचे पथक कार्यरत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर, एनडीआरएफचे पथक कार्यरत

Next

सांगली : पुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत. याशिवाय लष्करी जवानांच्या एका पथकासह त्यांचे वैद्यकीय सहाय्यता केंद्रही शहरात सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी रविवारी या मदतकार्याचा आढावा घेत पथकांना सूचना दिल्या.

गुरुवारी पाणीपातळी इशारा पातळी ओलांडण्याअगाेदरच प्रशासनाकडून एनडीआरएफ, पथकाची मागणी केली होती. त्यानुसार सुरुवातीला दोन पथके जिल्ह्यात दाखल झाली. वाळवा तालुक्यात व सांगली शहरात हे पथक सध्या मदतकार्यात व्यस्त आहे.

लष्कराचे एक पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, ते पलूस तालुक्यात आणि सांगली शहरात कार्यरत आहे. या लष्करी पथकाकडून शहरात दोन ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करून नागरिकांना मदत केली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कायम असलेल्या महापूर स्थितीमुळे प्रशासनाने आणखी दोन एनडीआरएफच्या पथकाची मागणी केली असून, सोमवारपर्यंत ती पथके दाखल होण्याची शक्यता आहे. त्यातील एक पथक कोल्हापुरात असले तरी रस्ते बंद असल्याने ते तिथेच अडकल्याने तेही पथक लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे.

Web Title: Army, NDRF team working to help flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.