बांधकाम साहित्य चोरून भंगारात विकणारा अटकेत, सांगली शहर पोलिसांची कारवाई
By शरद जाधव | Published: November 29, 2023 05:10 PM2023-11-29T17:10:39+5:302023-11-29T17:10:54+5:30
सांगली : शहरातील विविध भागातून बांधकामावरील साहित्य चोरून ते भंगारात विकणाऱ्यास शहर पोलिसांनी जेरबंद केले. भरत नामदेव जाधव (वय ...
सांगली : शहरातील विविध भागातून बांधकामावरील साहित्य चोरून ते भंगारात विकणाऱ्यास शहर पोलिसांनी जेरबंद केले. भरत नामदेव जाधव (वय ४०, रा. खणभाग, गोसावी गल्ली, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २५ हजार १४१ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, चार गुन्ह्यांचाही छडा लागला आहे.
शहरात होत असलेल्या वाढत्या घरफोडी, चोरीच्या घटनांच्या पाश्व'भूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, संशयित जाधव हा चोरीचा माल भंगारात विक्री करण्यासाठी कोल्हापूर रस्त्यावरील भंगार बाजारात आला आहे. त्यानुसार या भागात पोलिसांनी निगराणी ठेवली होती.
यावेळी संशयित एक लोखंडी गेट व बॅटर घेऊन आला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली त्यात चोरीची कबुली त्याने दिली. त्यानंतर साहित्य त्याच्याकडून जप्त करण्यात आले. पोलिसांनी जाधवला अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी त्याला सुनाविण्यात आली. शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.