सांगलीत चातुर्मासासाठी जयभानूशेखर विजयजींचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:23+5:302021-07-19T04:18:23+5:30
सांगली : युवा प्रवचनकार जैन मुनी जयभानूशेखर विजयजी महाराज व हिरशेखर विजयजी महाराज यांचे चातुर्मासासाठी सांगलीत आगमन झाले. येथील ...
सांगली : युवा प्रवचनकार जैन मुनी जयभानूशेखर विजयजी महाराज व हिरशेखर विजयजी महाराज यांचे चातुर्मासासाठी सांगलीत आगमन झाले. येथील अमिझरा पार्श्वनाथ जैन मंदिरात ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शासकीय नियमांचे पालन करीत शहरातील श्री अमीजारा पार्श्वनाथ जैन मंदिर येथे चातुर्मास प्रवेश झाला.
यावेळी जयभानूशेखर म्हणाले की, चातुर्मासच्या काळात धर्माची आराधना आणि कर्माची गती कशी असावी, याचा समतोल साधण्यासाठी प्रबोधन करणार आहोत. समाज आणि राष्ट्राचे भवितव्य हे भावी पिढीवर अवलंबून आहे. युवक संस्कारक्षम झाला तर धर्माचे आणि देशाचे रक्षण होईल, असे त्यांनी सांगितले.
महावीर भन्साळी यांनी सूत्रसंचालन केले. जैन युवक मंडळाने संयोजन केले. यावेळी सांगली जैन संघाचे अध्यक्ष सुभाष शाह, उपाध्यक्ष जतीन शाह, सचिव जितेंद्र नाणेशा, सहसचिव डॉ. चारूदत्त शाह, विश्वस्त नितीन शाह, अशोक शाह, धीरज दोषी, विपुल शाह, रोहन मेहता, सुशील मेहता, अक्षत संघवी उपस्थित होते.