पाणी समिती पदयात्रेचे मिरजेत आगमन
By admin | Published: July 5, 2015 10:54 PM2015-07-05T22:54:00+5:302015-07-06T00:23:33+5:30
सांगलीकडे रवाना : कर्नाटकात जाण्याचा इशारा
मिरज : जत पूर्व भागातील ४२ गावांना ‘म्हैसाळ’चे पाणी देण्याच्या मागणीसाठी अयोजित उमदी ते सांगली पदयात्रेचे आज मिरजेत आगमन झाले. ही पदयात्रा सोमवारी सकाळी सांगलीकडे रवाना होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीप्रश्नी चर्चा केली जाणार आहे.
जत पूर्व भागातील गावांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांचे जगणे मुश्किल झाले आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, असा पवित्रा घेत पाणी संघर्ष समितीने आंदोलन सुरु केले आहे. उमदी ते सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येणाऱ्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने दुष्काळग्रस्त सहभागी झाले आहेत.
आज दुपारी कवठेमहांकाळ येथून मिरजेत पदयात्रेचे आगमन झाले. माजी आमदार शरद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. बसवेश्वर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करुन शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरज महाविद्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
सुनील पोतदार, अनिल शिंदे, निवृत्ती शिंदे, चिदानंद रकटे, संगाप्पा सुरगोंड, दावल शेख, बसवराज कोट्याळ, काशिराम बिराजदार, संजीव तेली, महंमद खाटिक, बंडू जाधव, सुरेश पवार, हरी शेटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी, ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.
सोमवारी सकाळी मिरजेतून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलक पदयात्रेने जाणार आहेत. गेल्या (वार्ताहर)