कापडाच्या तुकड्यांतून साकारली सांगलीत शिवराज्याभिषेकाची कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:20 PM2019-01-17T12:20:50+5:302019-01-17T12:24:21+5:30

सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्याच्या अथक परिश्रमातून तब्बल २० हजार २८८ कापडाचे तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण सांगलीत झाले. तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

The art of Shivrajyabhisheki in Sangli originated from a piece of cloth | कापडाच्या तुकड्यांतून साकारली सांगलीत शिवराज्याभिषेकाची कलाकृती

कापडाच्या तुकड्यांतून साकारली सांगलीत शिवराज्याभिषेकाची कलाकृती

googlenewsNext
ठळक मुद्देकापडाच्या तुकड्यांतून साकारली शिवराज्याभिषेकाची कलाकृतीश्रुती दांडेकर यांचा उपक्रम : सांगलीत सादरीकरणकलाकृती जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प

सांगली : सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्याच्या अथक परिश्रमातून तब्बल २० हजार २८८ कापडाचे तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण सांगलीत झाले. तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

शिवराज्याभिषेकाची कलाकृती भारतात प्रसिद्ध आहे. तिला जागतीक पातळीवर नेण्याचा माझा प्रयत्न असल्याचे दांडेकर यांनी सांगितले. आता ही क्विल्ट २५ ते २७ जानेवारी चेन्नई येथे होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

क्विल्ट म्हणजे आजीबार्इंच्या गोधडीचे आधुनिक रुपडे. भारतात अगदी पूर्वापार चालत आलेल्या, पण हळूहळू कालबाह्य होत चाललेल्या या कलेला गेल्या काही वर्षांत नवजीवन मिळाले आहे. अधिकाधिक स्त्रियांनी ही कला शिकावी याकरिता श्रुती मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, पुणे व सांगली येथे अनेक वर्कशॉप घेतात.

क्विल्टमध्ये पोर्ट्रेट करणे ही त्यांची खासियत आहे. त्यांनी दहा महिन्यांपूर्वी शिवराज्याभिषेक कलाकृतीचे क्विल्ट हाती घेतले. त्यासाठी ७०८ तास त्यांनी परिश्रम घेतले. या क्विल्टमध्ये अगदी ३ मि.मि. इतके लहान तुकडेही आहेत. तब्बल २८८ रंगाचे २० हजार ८८८ तुकडे जोडून ही क्विल्ट तयार करण्यात आली आहे. तिचे शिवणकाम पुण्यातील स्टुडियो बानी येथील मनीषा अय्यर यांनी केले आहे. या क्विल्टसाठी श्रुती यांना बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन लाभले.

आभाळमाया फाउंडेशनच्यावतीने येथील रोटरी क्लब हॉल, गणेशनगर, येथे शिवराज्याभिषेक या क्विल्टचे सादरीकरण करण्यात आले. कला शिक्षिका भारती क्षीरसागर यांच्या हस्ते क्विल्टचे अनावरण करण्यात आले. आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, भारती विद्यापीठाचे डॉ. नितीन नायक, तानाजीराव मोरे, रोहित दांडेकर, आदि दांडेकर, अरुण दांडेकर, डॉ. जया कुऱ्हेकर, सुमेध शहा इत्यादी उपस्थित होते.
 

शिवराज्याभिषेकाची कलाकृती ही कलाक्षेत्रातील एक मानदंड आहे. अनेक प्रकारात ही कलाकृती आपल्यासमोर आली आहे. क्विल्ट स्वरुपात ही कलाकृती तयार करण्याचा विचार बऱ्याच वर्षापासून मनात होते. दहा महिन्यापूर्वी हे काम हाती घेतले. शिवरायांची महती महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. ही महती आपल्या कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर जावी अशी इच्छा होती. आता ही इच्छा पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.
- श्रुती दांडेकर,
डिझायनर
 

 

Web Title: The art of Shivrajyabhisheki in Sangli originated from a piece of cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.