लोकनायक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण दांडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:07+5:302021-05-25T04:30:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील लोकनायक शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

Arun Dandekar as the Chairman of Lok Nayak Shikshan Mandal | लोकनायक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण दांडेकर

लोकनायक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण दांडेकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : येथील लोकनायक शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अरुण दांडेकर, तर उपाध्यक्षपदी गौतम पवार यांची निवड झाली.

लोकनायक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी मंडळाची घोषणा करण्यात आली. या मंडळात सचिवपदी डॉ. नीलेश पत्की, सहसचिवपदी रामचंद्र देशपांडे, तर संचालक म्हणून डॉ. अशोक मेहता, मयुरेश पतकी, हणमंत पवार, सतीश बावडेकर, डॉ. श्रीहरी पुरंदरे, श्रीकृष्ण कुलकर्णी, गणेश जोशी, दिनेश पारेख, प्रेमचंद पांड्याजी, अलमतीन बारस्कर, अशोक गोसावी, तसेच तज्ज्ञ संचालक सौ. संयोगीता पवार आणि डॉ. सौ. शुभदा गोखले यांची बिनविरोध निवड झाली .

संस्थेच्यावतीने यशवंतनगर येथे न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श विद्यामंदिर, सनराईज इंग्लिश स्कूल, सांगलीत विद्यामंदिर हायस्कूल, विद्यामंदिर प्राथमिक शाळा चालविल्या जात आहेत. भावी काळामध्ये स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रम तसेच पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

Web Title: Arun Dandekar as the Chairman of Lok Nayak Shikshan Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.