अरुण जाधव यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:50 AM2021-02-21T04:50:37+5:302021-02-21T04:50:37+5:30

कवठे एकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील अरुण अशोक जाधव यांनी खातेअंतर्गत स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. ...

Arun Jadhav elected as Sub-Inspector of Police | अरुण जाधव यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

अरुण जाधव यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

Next

कवठे एकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील अरुण अशोक जाधव यांनी खातेअंतर्गत स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. या यशाबद्दल त्यांचा कवठेएकंद येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९६ ची बॅच व ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

अतिशय खडतर परिस्थितीतून संघर्ष करत अरुण जाधव यांनी हे यश साध्य केले. घरच्या पारंपरिक बुरुड व्यवसायात आजी, आई-वडिलांना मदत करत शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण करताना कवठे एकंदच्या हायस्कूलमध्ये ‘कमवा व शिका’ या संकल्पनेचा धडा गिरविला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत २००२ मध्ये पोलीस खात्यात भरती झाले. मैदानी प्रशिक्षणासाठी क्रीडा प्रशिक्षक संतोष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सध्या ते सांगली पोलीस मुख्यालय येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सेवा बजावत खातेअंतर्गत २०१७ साली एमपीएससी परीक्षा दिली होती. नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. पोलीस विभागातील सतरा वर्षांची नोकरी करत असताना अनेक वेळा कटू प्रसंगांना सामना करावा लागला. कामकाजातील आव्हाने, शारीरिक अडचणीमुळे अनेक वेळा नकारार्थी भूमिका घ्यावी काय? असे प्रसंग आले असे त्यांनी सांगितले.

फोटो-२०अरुण जाधव

Web Title: Arun Jadhav elected as Sub-Inspector of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.