अरुण लाड यांचे राजारामबापूंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:44+5:302020-12-06T04:28:44+5:30

इस्लामपूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार ...

Arun Lad greets Rajarambapu | अरुण लाड यांचे राजारामबापूंना अभिवादन

अरुण लाड यांचे राजारामबापूंना अभिवादन

Next

इस्लामपूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अरुण लाड यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी लाड यांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी सभापती किसन जानकर, नगरसेवक खंडेराव जाधव, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सर्जेराव देशमुख यांनी लाड यांचा सत्कार केला. अरुण लाड म्हणाले, माझ्या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तसेच माझ्यासाठी अहोरात्र प्रचार केलेल्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांना जाते. मी पुढील कारकीर्दीत आदर्शवत काम करून सर्वांचा विश्वास सार्थ करेन.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, उदय लाड, प्राचार्य प्रताप लाड, उपसभापती अरुण पवार, कुंडलिक एडके, अनिल लाड, कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष विकास पवार, पदवीधर सेलचे प्रवीण डबाणे, हौसेराव पाटील, प्रशांत कदम, उत्तम पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.

फोटो : ०५ इस्लामपूर २

ओळी : राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास नूतन आमदार अरुण लाड यांनी अभिवादन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, शरद लाड, किरण लाड, अविनाश पाटील, ॲड. बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, भरत देशमुख, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, सर्जेराव देशमुख उपस्थित होते.

Web Title: Arun Lad greets Rajarambapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.