‘केबीपी’च्या प्राचार्यपदी अरुण पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:38+5:302021-05-16T04:24:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. अरुण पाटील यांची निवड झाली.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी प्रा. डॉ. अरुण पाटील यांनी दिली.
पाटील यांच्या नोकरीची सुरुवात याच महाविद्यालयातून झाली होती. त्यानंतर ३१ वर्षे येथील कुसुमताई कन्या महाविद्यालयात कार्यरत होते होते. शिवाजी विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे ते दोनवेळा अध्यक्ष होते. तीस पुस्तकांमधून लेखक व सहलेखक म्हणून भरीव काम केले. त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली आहे. दि डेक्कन इंटरनॅशनल जिओग्राफिकल सोसायटीचे कार्यकारी संचालक, महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदचे कार्यकारी संचालक व खजिनदार म्हणून काम पाहिले आहे. त्याबरोबरच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम केले आहे. सध्या ते भूगोल व भूगर्भशास्त्र संशोधन मंडळाचे सदस्य आहेत.
डॉ. एच. टी. दिंडे यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर. डी. पाटील, उपाध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील, संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बी. ए. पाटील, प्रशांत वाजे, महेश पाटील, सतीश पाटील. डी. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.