सांगली जिल्हा परिषदेत मिळाली तब्बल 'साडेसहा हजार किलो'ची रद्दी, कालबाह्य कागदपत्रांची विल्हेवाट लावणार

By संतोष भिसे | Published: December 28, 2023 06:33 PM2023-12-28T18:33:45+5:302023-12-28T18:34:06+5:30

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील तब्बल ६५ टन कालबाह्य कागदपत्रे बाजुला काढण्यात आली आहेत. त्यांची विल्हेवाट लावली ...

As much as six and a half thousand kilos of junk was found in Sangli Zilla Parishad | सांगली जिल्हा परिषदेत मिळाली तब्बल 'साडेसहा हजार किलो'ची रद्दी, कालबाह्य कागदपत्रांची विल्हेवाट लावणार

सांगली जिल्हा परिषदेत मिळाली तब्बल 'साडेसहा हजार किलो'ची रद्दी, कालबाह्य कागदपत्रांची विल्हेवाट लावणार

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील तब्बल ६५ टन कालबाह्य कागदपत्रे बाजुला काढण्यात आली आहेत. त्यांची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

प्रशासकीय कामकाजात गतिमानतेसाठी विभागीय आयुक्तांनी पावसाळी अभियान उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व विभागांतील अभिलेख्यांचे वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये सुमारे ६५ टन मुदतबाह्य कागदपत्रे आढळली. ती व्यवस्थितपणे नष्ट करण्याचा आदेश संबधित विभागांना देण्यात आले आहेत. कालबाह्य फायलींचे अ, ब, क व ड या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. 

कडेगावमध्ये ५५० किलो, मिरजेत १०१५ किलो, तासगावमध्ये १०४५ किलो, खानापुरात ५०७ किलो, आटपाडीत १८५८ किलो, कवठेमहांकाळमध्ये २३४५ किलो, जतमध्ये १९७१ किलो, शिराळ्यात ५३४८ किलो, वाळव्यात २६९१ किलो आणि पलूसमध्ये २४४४ किलो निरुपयोगी कागदपत्रे आढळली.  

जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाकडे २७० किलो, समाजकल्याणमध्ये २०० किलो, पशुसंवर्धनमध्ये २००० किलो, प्राथमिक शिक्षणमध्ये ३६४० किलो, कृषी विभागात ५६० किलो, जलसंधारणमध्ये १०६ किलो, बांधकाम विभागात ८०० किलो, महिला व बालकल्याण विभागात ४० किलो, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडे ८८ किलो, आरोग्य विभागात १६१५ किलो आणि माध्यमिक शिक्षणमध्ये १५० किलो कागद आढळले. 

या स्वच्छता मोहिमेमुळे नवी कागदपत्रे ठेवण्यास जागा उपलब्ध होणार आहे. आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध होऊन वेळेची बचत व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: As much as six and a half thousand kilos of junk was found in Sangli Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.