आशा-गट प्रवर्तकांचे आजपासून महापालिकेसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:03+5:302021-08-12T04:30:03+5:30
सांगली : महापालिकेअंतर्गत काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना कोविड प्रोत्साहन भत्ता मिळाला नसल्याच्या निषेधार्थ बुधवारपासून (दि. ११) महापालिकेसमोर उपोषण ...
सांगली : महापालिकेअंतर्गत काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना कोविड प्रोत्साहन भत्ता मिळाला नसल्याच्या निषेधार्थ बुधवारपासून (दि. ११) महापालिकेसमोर उपोषण सुरू केले जाणार आहे. लाल बावटा आशा गट प्रवर्तक युनियनतर्फे उमेश देशमुख व वर्षा ढोबळे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आशा व गट प्रवर्तकांना कोविड भत्ता देण्याचा ठराव महापालिकेने एप्रिलच्या महासभेत मंजूर केला, त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल आल्यानंतर भत्ता दिला जाईल या सबबीवर अडवणूक सुरु आहे. ठराव होऊन चार महिने झाले तरी अहवाची कारणे सांगितली जात आहेत. कोविड भत्ता प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करणार आहोत.