आशा सेविका, कामगारांचे प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:22+5:302021-07-02T04:18:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेकडील बदली, मानधनावरील कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी संघर्ष सफाई व इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेकडील बदली, मानधनावरील कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्यावतीने आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे, उपाध्यक्ष शरद सातपुते यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यात म्हटले आहे की, माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रावर गेली २५ वर्षे बदली व मानधनवरील कामगार तांत्रिक पदावर काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्तीचे आदेश काढून त्यांना कुशल वेतनश्रेणी लागू करावी, कायम कर्मचाऱ्यांना २०१७ पासूनचा सुट्ट्याचा पगार मिळावा, माळबंगला येथे मानधनावर जादा कर्मचारी नियुक्त करावेत, आशासेविकांना ड्रेस कोडवर पांढरा ॲपरन घालण्यास परवानगी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचा विचार करून तात्काळ प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.