अशोक खाडे यांना सांगली भूषण पुरस्कार-: उद्योग क्षेत्रातील अलौकिक कार्याची दखल-अरुण दांडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:46 PM2018-11-29T12:46:49+5:302018-11-29T12:47:48+5:30
विश्व जागृती मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा सांगली भूषण पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांना जाहीर करण्यात आला असून लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा
सांगली : विश्व जागृती मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा सांगली भूषण पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांना जाहीर करण्यात आला असून लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा सांगलीत होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सांगलीचे नाव विविध क्षेत्रात झळकविणाºया व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. सांगलीचा हा मानाचा पुरस्कार असून गेल्या वीस वर्षापासून तो दिला जात आहे. रोख २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे याचे स्वरुप आहे. उद्योग क्षेत्रात आंतरराष्टय स्तरावर सांगलीचे नाव झळकविणाºया अशोक दगडू खाडे यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. खाडे यांचा जन्म १९५५ मध्ये पेड (ता. तासगाव) येथे झाला. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. तरीही यातून बाहेर पडण्यासाठी शिाक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले.
चरितार्थ व शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. त्यांनी माझगांव डॉक लि. येथे नोकरी केली. हे काम करीत त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. याशिवाय बी. ए. (मानसशास्त्र), एम. फील (तत्वज्ञान), डॉक्टरेट आणि डी. आॅफ सायन्स अशा पदव्या मिळविल्या. त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत कंपनीने त्यांना पाणबुड्या बनविण्याकामी त्यांना जर्मनला पाठविले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू केला. दास आॅफ शोअर,दास आॅफ पेट्रोलियम, दास मरीन सेज प्रा. लि. आबुधाबी दा इन्सट्र्युमेंटेशन अश कंपन्या उभारून ते विविध क्षेत्रात दिमाखात कार्यरत आहेत. तीन हजाराहून अधिकचा रोजगार त्यांनी निर्माण केला आहे. या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आजवरचे पुरस्कार
मंडळातर्फे आजवर गायिका आशा भोसले, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, मास्टर अविनाश, प्रा. म. द. हातकणंगलेकर, नानासाहेब चितळे, कवी सुधांशू, भाऊसाहेब पडसलगीकर, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, कृषीभूषण प्र. शं. ठाकूर, नेत्रतज्ज्ञ डॉ. भैय्यासाहेब परांजपे, खासदार आण्णासाहेब गोटखिंडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक धोंडिराम बापू माळी, मोहन रानडे, राजमतीआक्का पाटील, सुवर्ण व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, प्रा. डॉ. एन. डी. पाटील आदींना सांगली भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.