अशोका ॲग्रोचे सतीश पाटील यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:25+5:302021-02-05T07:19:25+5:30

आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रो फर्ट उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सतीश पाटील यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या ...

Ashoka Agro's Satish Patil awarded 'Doctorate' | अशोका ॲग्रोचे सतीश पाटील यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान

अशोका ॲग्रोचे सतीश पाटील यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान

Next

आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रो फर्ट उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सतीश पाटील यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने सेंद्रिय खतांची निर्मिती, प्रसार तसेच शेती विकास या क्षेत्रांतील योगदानाबद्दल डी लिट मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात मालदीवचे शिक्षण मंत्री डॉ. अब्दुल्लाह रशीद, आशिया विभागीय व्हॉइस चान्सलर डॉ. दिपुरंजन सिन्हा, एज्युकेशन डीन डॉ. प्रियदर्शी नायक यांच्या हस्ते सतीश पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी, भारत सरकारच्या एनटीएएमओईचे महासंचालक डॉ. विनित जोशी, माजी केंद्रीय शिक्षण सचिव अनिल स्वरुप, दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. दिनेश सिंग, भारत सरकारच्या 'एनआयओएस- एमएचआरडी'चे माजी अध्यक्ष प्रो. सी. बी. शर्मा उपस्थित होते.

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरुण लाड यांनी डॉ. सतीश पाटील यांचे अभिनंदन केले.

फोटो-२७आष्टा२

फोटो

: नवी दिल्ली येथे सतीश पाटील यांना मालदीवचे शिक्षण मंत्री डॉ. अब्दुल्लाह रशीद अहमद यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. दिपुरंजन सिन्हा, डॉ. प्रियदर्शी नायक उपस्थित होते.

Web Title: Ashoka Agro's Satish Patil awarded 'Doctorate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.