आष्ट्यात एकाच घरातील ५ रुग्ण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:52+5:302021-04-26T04:23:52+5:30
फोटो: २५०४२०२१-आयएसएलएम-आष्टा थोटे मळा न्यूज आष्टा थोटे मळा येथील एकाच घरातील ५ रुग्ण कोरोना बाधित झाल्याने या परिसरात पालिकेच्यावतीने ...
फोटो: २५०४२०२१-आयएसएलएम-आष्टा थोटे मळा न्यूज
आष्टा थोटे मळा येथील एकाच घरातील ५ रुग्ण कोरोना बाधित झाल्याने या परिसरात पालिकेच्यावतीने औषध फवारणी करण्यात आली. घटनास्थळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी भेट दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : शहरात एकाच घरातील ५ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. शनिवारी शहरातील ४ वयोवृद्धांचा मृत्यू झाला.
रविवारी थोटे मळा परिसरात एकाच घरातील ५ रुग्ण सापडल्याने मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जंतुनाशक औषधाची फवारणी केली.
आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. १ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने संख्या वाढत आहे. शनिवारी एकूण १३ रुग्ण सापडले. १ जानेवारीपासून २५ एप्रिलपर्यंत १५१ रुग्ण सापडले आहेत. यातील ११२ रुग्ण सक्रिय आहेत. आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष निगडी शहरातील विविध भागात रुग्ण सापडलेल्या ठिकाणी भेट देऊन आरोग्य विषयक जनजागृती करीत आहेत. आष्टा शहरातील सर्वच भागात रुग्णांची संख्या वाढली आहे.
डॉ. चव्हाण यांनी शहरातील सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.