आष्ट्यात सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विश्वास सार्थ ठरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:08+5:302021-03-09T04:30:08+5:30
ओळ : आष्टा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी वैभव शिंदे, झुंजारराव शिंदे, विशाल शिंदे, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, सारिका मदने, वसंतराव ...
ओळ : आष्टा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी वैभव शिंदे, झुंजारराव शिंदे, विशाल शिंदे, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, सारिका मदने, वसंतराव माने उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरातील रस्त्यासह विविध विकासकामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. विकासकामांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येत आहे. जनतेचा विश्वास सत्ताधारी आघाडी सार्थ ठरवत आहे, असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी केले.
येथील विलासराव शिंदे नगरमधील रस्ता कामाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झुंजारराव शिंदे, पक्षप्रतोद विशाल शिंदे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, नगरसेवक जगन्नाथ बसुगडे, नगरसेविका सारिका मदने, वरदराज शिंदे, वसंतराव माने, अंकुश मदने, बाबूजी गुजले, दत्तराज हिप्परकर उपस्थित होते.