आष्टा पालिकेने शास्ती कर माफ करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:09+5:302021-03-10T04:28:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा नगरपरिषदेने कर थकीत गेल्यानंतर जी शास्ती लावली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा नगरपरिषदेने कर थकीत गेल्यानंतर जी शास्ती लावली जाते, ती माफ करावी, अशी मागणी आष्टा शहरातील जलसंपदा मंत्री जयंत पाटील समर्थकांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचे संकटामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी अनेक नागरिकांकडून थकीत आहे. या थकीत करावर जी शास्ती लावली आहे, ती माफ करण्यात यावी.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, माजी उपनगराध्यक्ष रघुनाथ जाधव, विजय मोरे, राजारामबापू कारखाना संचालक विराज शिंदे, दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, रामचंद्र सिद्ध, शेतकरी विणकरी सूतगिरणीचे अध्यक्ष बबन थोटे, प्रभाकर जाधव, दीपक मेथे पाटील उपस्थित होते.