आष्टा पीपल्स बँकेला ७ कोटी ७ लाखांचा नफा -काैशिक वग्याणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:25 AM2021-04-14T04:25:06+5:302021-04-14T04:25:06+5:30
फाेटाे : १३ अनिल मडके लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील दी आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला ३१ मार्चअखेर ७ ...
फाेटाे : १३ अनिल मडके
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील दी आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला ३१ मार्चअखेर ७ कोटी ७ लाख नफा झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सर्व तरतुदी वजा करता बँकेला ३ कोटी १० लाख निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कौशिक वग्यानी यांनी दिली.
वग्यानी म्हणाले, ३१ मार्चअखेर बँकेचे भाग भांडवल १२ कोटी ७ लाख, राखीव व इतर निधी ३५ कोटी ६२ लाख, ठेवी ३३४ कोटी ४५ लाख, कर्ज १९७ कोटी ४ लाख, गुंतवणूक १५७ कोटी ७४ लाख, भांडवली गुंतवणूक २ कोटी ७८ लाख, एकूण व्यवसाय ५३१ कोटी ४९ लाख प्रतिसेवक व्यवसाय ५ कोटी ७८ लाख, सीडी रेशो ६८.९१ टक्के, थकबाकी २ कोटी ६८ लाख, निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या बँकेच्या सध्या सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत १९ शाखा कार्यरत आहेत. त्या सर्व ऑनलाइन व संगणकीकृत आहेत. बँकिंग व्यवसायाची सहा तपे यशस्वीपणे पूर्ण करीत सभासदांचा विश्वास संचालक मंडळाने प्राप्त केला आहे. बँकेच्या स्वमालकीचे डेटा सेंटर असून स्वतःचे डेटा सेंटर असणारी ग्रामीण भागातील एकमेव सहकारी बँक आहे. मोबाइल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस बँकिंग, सीटीएस चेक, एनी ब्रांच बँकिंग एटीएम रूपे डेबिट कार्ड यासारखे अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. नैसर्गिक संकट व कोरोना संकट काळात बँकेच्या १९ पैकी ५ शाखांची १०० टक्के तर उर्वरित १४ शाखांची ९९ टक्के कर्ज वसुली झाली आहे. बँक स्थापनेपासून ऑडिट वर्ग असून सभासदांना सतत १० ते २२ टक्के लाभांश दिलेला आहे.
यासाठी उपाध्यक्ष अनिल मडके, मार्गदर्शक बबन थोटे, दिलीप वग्यानी, जयदीप थोटे, विराज शिंदे, फंचू हालुंडे, रामचंद्र सिद्ध, सुनील वाडकर, अनिल पाटील, अजित शिरगावकर ,दादासाहेब कोरुचे, प्रणव चौगुले, पुरणकुमार माळी, विष्णू वारे, उषाराणी आवटी, उषा कवठेकर, विनोद पाटील, अनिल चौगुले यांच्यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मासाळ व कर्मचारी सल्लागार सदस्य यांचे सहकार्य लाभले.