आष्ट्यामधील दिग्गजांचे प्रभाग सोडतीत पुन्हा सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2016 12:22 AM2016-07-03T00:22:03+5:302016-07-03T00:22:03+5:30
पालिका आरक्षण सोडत : १० प्रभागातील २४ जागांचे आरक्षण
आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या १० प्रभागातील २३ जागांसाठीची आरक्षण सोडत शनिवारी पालिकेचे आनंदराव देसावळे, भूसंपादन अधिकारी निवास कोळी, मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, विशालभाऊ शिंदे, झुंझारराव पाटील यांना सुरक्षित प्रभाग मिळाले आहेत, तर शैलेश सावंत यांना लॉटरी लागली असून, तानाजी सूर्यवंशी, सतीश माळी यांना प्रभाग शोधावा लागणार आहे.
विटा नगरपरिषदेची नवीन द्विसदस्यीय प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी सत्ताधारी गटाचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे यांच्यासह सतीश माळी, उदय कुशिरे, समीर लतीफ, प्रभाकर जाधव, अमोल पडळकर, अर्जुन माने, गुंडाभाऊ आवटी, पोपट भानुसे, वीर कुदळे, राहुल थोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आष्टा पालिकेसाठी आरक्षण सोडतीत खालीलप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग क्रमांक १ - अ - ओबीसी महिला ब- पुरूष खुला , प्रभाग क्रमांक २ - अ- अनुसूचित जाती जमाती महिला ब - पुरूष खुला, प्रभाग क्रमांक ३ - अ- अनुसूचित महिला ब - पुरुष खुला , प्रभाग क्रमांक ४ - अ - अनुसूचित जाती पुरुष ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ५ - अ - पुरुष खुला ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ - अ- ओबीसी पुरुष ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र मांक ७ - अ- ओबीसी पुरुष ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ८ अ - ओबीसी महिला ब- पुरूष खुला गट, प्रभाग क्रमांक ९ - अ - ओबीसी महिला ब- पुरुष खुला , प्रभाग क्रमांक १० - अ- ओबीसी पुरुष ब- पुरुष खुला क- पुरुष खुला.
याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले. सत्ताधारी गटातील मातब्बरांना आरक्षण सोडतीत लॉटरी लागली आहे. कही खुशी काही गम असे वातावरण होते. आष्टा पालिकेची प्रभाग रचना फोडल्यामुळे काही विद्यमान नगरसेवकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे काहींना प्रभाग बदलावा लागणार आहे. काही भाग बदलल्याने उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.
आष्टा नगरपरिषदेच्या १० प्रभागातील २३ जागांसाठीची आरक्षण सोडत आज पार पडल्याने इच्छुकांनी आतापासूनच आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्यापासून यासाठी इच्छुक उमेदवारांना अभ्यास सुरु होणार आहे. (वार्ताहर)
काहींना लागली पुन्हा लॉटरी
आरक्षण सोडतीत सौ. मंगलादेवी शिंदे, झुंझारराव पाटील, धैर्यशील शिंदे, विशाल शिंदे यांचे प्रभाग जैसे थे राहिल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. माजी उपनगराध्यक्ष शैलेश सावंत यांचा प्रभाग पुन्हा खुला झाल्याने त्यांना लॉटरी लागली आहे, तर सौ. संगीता सूर्यवंशी यांचाही प्रभाग कायम राहिल्याने तानाजी सूर्यवंशी यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
पर्यायाचा शोध सुरू
माजी उपनगराध्यक्ष तानाजी सूर्यवंशी यांचा प्रभाग पुन्हा महिला उमेदवारांसाठी राखीव झाल्याने सौ. संगीता सूर्यवंशी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता असून तानाजी सूर्यवंशी यांना प्रभाग शोधावा लागणार आहे. तसेच शैलेश सावंत यांचा प्रभाग खुला झाल्याने सौ. रागिणी सावंतऐवजी स्वत: शैलेश सावंत यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सतीश माळी यांच्याऐवजी पुष्पलता माळी, तसेच अमोल पडळकर, लता पडळकर, राजू आत्तार, बाळासाहेब वाडकर, अर्जुन माने, संग्राम जाधव, मयूर धनवडे, इसामुद्दीन मुल्ला, प्रणव चौगुले, आयेशा इनामदार, सौ. रंजना शेळके, विजय मोरे, उदय कुशिरे, प्रभाकर जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.