अपघातग्रस्त शिक्षकाला मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:29+5:302021-01-15T04:22:29+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूक २०२१ चे काम करीत असताना रविवार दि. १० डिसेंबर २१ रोजी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी ...
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूक २०२१ चे काम करीत असताना रविवार दि. १० डिसेंबर २१ रोजी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी जात असताना हातनूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश पाटील यांचा अपघात होऊन त्यांच्या मेंदूला जबर मार बसला. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या कर्मचाऱ्याला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी तहसीलदार ढवळे यांनी हा प्रस्ताव तात्काळ पुढील कार्यालयात सादर करून संबंधित कर्मचाऱ्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळामध्ये अविनाश गुरव, श्रीकांत पवार, नंदकुमार खराडे, शब्बीर तांबोळी, आटपाडी तालुकाध्यक्ष आसिफ मुजावर, गुलाब नदाफ, रणजित नाटेकर, सतीश पवार, रमेश दगडे, नीलेश लांडगे उपस्थित होते.
चौकट :
दोन लाख रुपयांची मदत
सुरेश पाटील यांच्याबाबतीत आकस्मिक घटना घडल्यानंतर त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराचा खर्च करण्यासाठी संभाजीराव थोरातप्रणित शिक्षक संघाकडून दोन लाख रुपयांची मदत गोळा करून देण्यात आली.
फोटो-१४तासगाव१