वसंतदादा बँकेच्या माजी संचालकांच्या मालमत्ता जप्त

By Admin | Published: January 12, 2017 11:49 PM2017-01-12T23:49:36+5:302017-01-12T23:49:36+5:30

चौकशी अधिकाऱ्यांचे आदेश : २८ जणांचा समावेश, दिग्गज नेत्यांना धक्का; २४७ कोटींचा घोटाळा

The assets of former directors of Vasantdada Bank were seized | वसंतदादा बँकेच्या माजी संचालकांच्या मालमत्ता जप्त

वसंतदादा बँकेच्या माजी संचालकांच्या मालमत्ता जप्त

googlenewsNext

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी २३ माजी संचालक, मृत माजी संचालकांचे ३ वारसदार आणि दोन अधिकारी अशा २८ जणांच्या स्थावर मालमत्तांच्या जप्तीचे आदेश चौकशी अधिकारी अ‍ॅड. आर. डी. रैनाक यांनी दिले. कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, नगरसेवक सुरेश आवटी, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांचा यात समावेश असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाऱ्या या बँकेतील तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर केले. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्ज प्रकरणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखांच्या रकमेबाबत आता आरोप ठेवण्यात आले होते. दोषारोपपत्रावरील सुनावणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, या प्रकरणातील काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांची मालमत्ता विक्रीस काढली होती. वृत्तपत्रात त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल चौकशी अधिकाऱ्यांनी घेतली.
भविष्यातील वसुलीच्या कारवाईस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६0 च्या कलम ८८ व ९५ मधील तरतुदीनुसार प्रकरणातील माजी संचालकांच्या व अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश गुरुवारी दिले. यासंदर्भातील आदेशाची
प्रत रैनाक यांनी जिल्हा उपनिबंधकांसह महसुली अधिकाऱ्यांना दिली आहे. संबंधित मालमत्तांच्या विक्री, हस्तांतर, तारणगहाण, भाडेपट्टी अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराला मनाई करण्यात आली आहे. या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, मालमत्ता अभिलेखात प्राधिकृत चौकशी अधिकारी, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक अशी नोंद करण्याचे आदेशही दिले आहेत.
नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र चौकशीपूर्वी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पाच वर्षांपेक्षा जुन्या प्रकरणांना वगळण्यात आले. परिणामी चौकशीतून चार माजी संचालकांना वगळण्यात आले आहे. निर्णय प्रक्रियेत नसलेल्या ७३ पैकी ६९ कर्मचाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांनी, तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वगळले आहे. कर्मचाऱ्यांपैकी आता केवळ दोनच अधिकाऱ्यांवर आरोप ठेवले आहेत. (प्रतिनिधी)
चौकशीतील रकमा...
कलम ७२ (२) नुसार झालेल्या चौकशीत २८६ खातेदारांच्या ३६४ कोटी २0 लाख ५७ हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणांवर आक्षेप होते.
कलम ७२ (३) मधील चौकशीवेळी पाच वर्षापेक्षा जुन्या असलेल्या ६५ खात्यांची ५७ कोटी ८ लाख ५४ हजाराची कर्जप्रकरणे वगळली गेली.
चौकशीदरम्यान वसुली होऊन ५९ कोटी ३६ लाख ४९ हजार रुपयांची ११४ खाती बंद झाली.
७२ (३) प्रमाणे आता १0७ खात्यांच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण शिल्लक आहे.
यांच्या मालमत्ता केल्या जप्त...
नाव मालमत्तेचे ठिकाण
जयश्रीताई मदन पाटील कवलापूर, पद्माळे, सांगली
शशिकांत कलगोंडा पाटील अंकली
नरसगोंडा सातगोंडा पाटील नांद्रे
सुरेश आदगोंडा पाटील सांगली
अमरनाथ सदाशिव पाटील कुपवाड, पद्माळे, माधवनगर
किरण राजाभाऊ जगदाळे सांगली
माधवराव ज्ञानदेव पाटील अंकलखोप
तुकाराम रामचंद्र पाटील कवठेपिरान
सुरेश देवाप्पा आवटी मौजे डिग्रज
प्रमिलादेवी प्रकाशराव मानेकुपवाड, आंधळी
सुभाष गणपती कांबळे मणेराजुरी
दादासाहेब वाघू कांबळे मौजे डिग्रज
निवृत्तीराव मारुती पाटील नागज
श्रीमती प्रेमा सतीश बिरनाळे सांगली
जंबू दादा थोटे आष्टा, सांगली
भरत महादेव पाटील बुधगाव
बेबीताई मारुती पाटील मौजे डिग्रज
निवास दत्ताजीराव देशमुख शिराळा
दत्तात्रय श्रीपती सूर्यवंशी अंकलखोप
सुधाकर धोंडीराम आरते कसबे डिग्रज
गजानन लक्ष्मणराव गवळी खंडेराजुरी, पेठभाग सांगली
सर्जेराव सखाराम पाटील शेरी कवठे
सुरेश जिनगोंडा पाटील समडोळी
अरविंद शामराव पाटील पद्माळे
श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे मौजे डिग्रज
आनंदराव मारुती पाटील सांगलीवाडी
भूपाल दत्तात्रय चव्हाण कुपवाड, सांगली
प्रकाश बाबूराव साठे तासगाव

Web Title: The assets of former directors of Vasantdada Bank were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.