इस्लामपुरात जायंट्स ग्रुपच्या वतीने पोलिसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:47+5:302021-04-30T04:32:47+5:30
ओळ : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर व नारायण हॉस्पिटलच्या वतीने बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना पिण्याच्या पाणी बॉटलचे वाटप केले. यावेळी ...
ओळ : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर व नारायण हॉस्पिटलच्या वतीने बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना पिण्याच्या पाणी बॉटलचे वाटप केले. यावेळी उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, निरीक्षक नारायण देशमुख, दुष्यंत राजमाने, रणजित जाधव, अॅड. श्रीकांत पाटील, राजकुमार ओसवाल उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर तसेच लक्ष्मी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड आयसीयू सेंटर यांच्या सहकार्याने कोरोना कालावधीत रस्त्यांवर उभे राहून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलीस बांधवांसाठी पिण्याचे पाणी व फ्रुट ज्यूसचे गुरुवारी वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे तसेच पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.
सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यांवर अहोरात्र उभारणाऱ्या पोलिसांसाठी जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने हा उपक्रम राबवून पोलिसांचे नैतिक बळ वाढविले असल्याचे गौरवोद्गार दोन्ही अधिकाऱ्यांनी काढले.
यावेळी अध्यक्ष दुष्यंत राजमाने, कार्यवाह रणजित जाधव, खजिनदार अॅड. श्रीकांत पाटील, युनिट डायरेक्टर राजकुमार ओसवाल, नितीन शहा व भूषण शहा, फेडरेशन ऑफिसर मंगल देसावळे, उपाध्यक्ष दत्तात्रय माने, सहखजिनदार अनिल पाटील यांसह सदस्य नितीन पारेख, अभय शहा, ईश्वरभाई पटेल, रवी सूर्यवंशी, राकेश कोठारी, नितीन फल्ले, अर्जुन पाटील उपस्थित होते.