राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य याेजनेतून सहा कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:45 AM2021-05-05T04:45:48+5:302021-05-05T04:45:48+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील ज्या कुटुंबात कर्तापुरुष किंवा महिलेचे आकस्मित निधन झाले आहे, अशा सहा कुटुंबांना संजय ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील ज्या कुटुंबात कर्तापुरुष किंवा महिलेचे आकस्मित निधन झाले आहे, अशा सहा कुटुंबांना संजय गांधी निराधार योजना समितीच्या अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
वाळव्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, नायब तहसीलदार धनश्री भांबुरे, अव्वल कारकून बंडा कदम, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे संघटक राजाराम जाधव, अनिल जाधव, दीपक चव्हाण, इम्तियाज पिरजादे प्रामुख्याने उपस्थित होते.
रेखा धनाजी थोरात (कि.म.गड), नीलम दीपक मगर (नागाव), संजीवनी दत्तात्रय जाधव (तांदूळवाडी), सुवर्णा अनिल कांबळे (उरुण इस्लामपूर), पूजा मल्लाप्पा सूर्यवंशी (इस्लामपूर), प्रवीण राजेंद्र पाटील (गोटखिंडी) यांना हे धनादेश वितरण करण्यात आले.
फोटो : ०४ इस्लामपूर १
ओळी- इस्लामपूर येथे राष्टीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून धनादेश वाटप करताना जयंतराव पाटील. समवेत संजय पाटील, बाळासाहेब पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार धनश्री भांबुरे व इतर.