प्राध्यापक मारहाणप्रकरणी संघटनेची माफीनाम्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:58+5:302021-09-09T04:32:58+5:30
शनिवार, दि. ४ रोजी सांगलीतील विद्यार्थी संघटनेने कसलीही शहानिशा न करता महाविद्यालयाच्या आवारात जाऊन प्राध्यापकाला मारहाण करून त्याच्या तोंडाला ...
शनिवार, दि. ४ रोजी सांगलीतील विद्यार्थी संघटनेने कसलीही शहानिशा न करता महाविद्यालयाच्या आवारात जाऊन प्राध्यापकाला मारहाण करून त्याच्या तोंडाला काळे फासले होते. त्यामुळे प्रभारी प्राचार्य ए. एल. शिंदे यांनी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्रा. विकास बोडरे यांना तत्काळ कामावरून कमी करण्याची कारवाई केली होती. याप्रकरणी संघटनेने दिलेल्या तक्रारीत केवळ रॅगिंग आणि लैंगिक शोषण असे मोघम आरोप केले. मात्र, नेमके काय केले, याचा कसलाही उल्लेख त्यात नाही.
प्राचार्य शिंदे यांनी प्रा. बोडरे शिकवत असलेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींना समक्ष बोलावून चौकशी केली. पण, त्यात कुणाचीच, कसली तक्रार नव्हती. ज्या स्वप्नील संकपाळ (रा. जत) या सतत गैरहजर राहणा ऱ्या आणि मुलींना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने लेखी माफीनामा सादर करणाऱ्या विद्यार्थ्याने प्राध्यापकांवर दबाव आणून माफीनामा मागितल्याचा वचपा काढण्यासाठी संघटनेचा गैरवापर केला.
प्रा. बोडरे यांनी नेमका काय त्रास दिला, हे सांगण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थ्याला बोलावले होते. पण तो आतापर्यंत बाजू मांडण्यासाठी आलेला नाही. त्याचे पालकही यायला तयार नाहीत.
चौकट
लोकमतचे आभार!
‘आटपाडीत संघटनेच्या नावावार गुंडगिरी सुरू’, या मथळ्याखाली लोकमतने बुधवार, दि. ८ रोजीच्या अंकात प्राध्यापकांवरील अन्यायाला वाचा फोडणारे वृत प्रसिद्ध केले होते. प्रा. विकास बोडरे यांच्यासह प्राध्यापकांनी रोखठोक वस्तुस्थिती मांडल्याचे सांगत लोकमतचे मनापासून आभार व्यक्त केले. प्रा. बोडरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहानिशा न करता अपुऱ्या माहितीवर आंदोलन केल्याने आणि त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल माफीनामा लिहून देणार असल्याचे सांगितले.
कोट
महाविद्यालयाच्या आवारात जाऊन प्राध्यापकाला मारहाण केली, तेव्हाच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे होते. आताही अन्यायग्रस्त प्राध्यापकांनी तक्रार द्यावी. संबधितांवर योग्य ती कारवाई करू.
- भानुदास निंभोरे,
पोलीस निरीक्षक, आटपाडी.