पुष्पाच्या ‘एंट्री’वर बेधुंद होऊन नाचायला लागला, सांगलीत चाहत्याला पोलिसांनी ताब्यात घेतला, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:26 IST2024-12-10T13:26:02+5:302024-12-10T13:26:32+5:30
सांगली : सध्या प्रेक्षकांची गर्दी खेचत असलेल्या ‘ पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका चाहत्याने चक्क कपडे काढून टाकत ...

पुष्पाच्या ‘एंट्री’वर बेधुंद होऊन नाचायला लागला, सांगलीत चाहत्याला पोलिसांनी ताब्यात घेतला, अन्..
सांगली : सध्या प्रेक्षकांची गर्दी खेचत असलेल्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका चाहत्याने चक्क कपडे काढून टाकत ठेका धरला. त्यामुळे महिला वर्गाला माना खाली घालाव्या लागल्या. प्रेक्षकांनी आरडाओरड केल्यानंतरही त्याचा धिंगाणा सुरूच होता. अखेर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत खाक्या दाखवला.
पुष्पा २ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये याची चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच चित्रपटगृहांत चाहत्यांची गर्दी दिसत आहे. शहराबाहेरील न्यू प्राईड येथे चित्रपट पाहण्यासाठी एक चाहता मित्रासोबत गेला होता. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच त्याने ‘पुष्पा’ स्टाइलप्रमाणे चालत त्याने अनेकांचे लक्ष वेधले. चित्रपट सुरू झाल्यानंतर पुष्पा एंट्रीवर शिट्यांचा पाऊस पडला. तेव्हा हा चाहता लागलीच जागा झाला. त्याने स्वत:ला पुष्पा समजत पडद्यासमोर जाऊन स्वतःचे कपडे काढून टाकले. त्यानंतर तो नाचायला लागला.
चित्रपट पाहण्यासाठी अनेक महिलांचीही उपस्थिती होती. त्याचा नाच पाहून महिलांनी मान खाली घातली. काहींनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली. तेथून शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांना थेट फोन गेला. त्यांनी तातडीने पोलिस कर्मचारी पाठवले. पोलिसांनी तातडीने मल्टिप्लेक्समध्ये येऊन चाहत्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत हा चाहता धुंदीतच होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने माफी मागितली. पुन्हा चित्रपटच पाहणार नाही, अशी शपथ घेतली.