‘लव्ह जिहाद’च्या नावाने महिलांवरील अत्याचार किती दिवस सहन करणार? - नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:17 AM2024-08-14T11:17:47+5:302024-08-14T11:18:33+5:30

पलूसमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाची सभा

At the centre, the state has a Hindutva government remember; Warning of MLA Nitesh Rane | ‘लव्ह जिहाद’च्या नावाने महिलांवरील अत्याचार किती दिवस सहन करणार? - नितेश राणे 

‘लव्ह जिहाद’च्या नावाने महिलांवरील अत्याचार किती दिवस सहन करणार? - नितेश राणे 

पलूस : भारतात, महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या नावाने हिंदू भगिनींवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. हे आपण किती दिवस सहन करणार आहाेेत. हिंदू जागृत होणार आहेत की नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत आम्ही तयार झालो आहोत आणि केंद्रात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

पलूस येथे मंगळवारी शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्यावतीने आयोजित सभेत राणे बोलत होते. यावेळी हर्षाताई ठाकूर व माजी खासदार अमर साबळे उपस्थित होते. प्रारंभी पलूस शहरातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

राणे म्हणाले, आपल्या देशात हिंदूंच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’ हे खूप मोठे षडयंत्र आहे. भारत देश हिंदूंचा राखायचा असेल, तर हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. हिंदू सतर्क राहिला नाही याची माेठी किंमत माेजावी लागेल, हे लक्षात ठेवा.

लव्ह जिहाद व वक्फ बोर्ड हे एक माेठे षडयंत्र आहे. हा कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द झालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. केंद्रातील भाजपा सरकारकडून लवकरच वक्फ बोर्डाबाबत हिंदूंना गोड बातमी मिळेल.

यावेळी विवेक साबळे व हर्षाताई ठाकूर यांची भाषणे झाली. सुरुवातीला पलूस येथील कुंडल वेस, मुख्य बाजारपेठ, मुख्य चौकातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सर्जेराव नलवडे, रामानंद पाटील, संग्राम कुलकर्णी, प्रदीप वेताळ, रोहित पाटील व नागरिक, युवक उपस्थित होते.

लव्ह जिहाद हे षडयंत्र

राणे म्हणाले, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू भगिनींवर अत्याचार सुरू आहेत. वक्फ बोर्ड हेही एक षडयंत्र आहे. देशातील तमाम हिंदू बांधवांनी याबाबत वेळीच जागरुक झाले पाहिजे. हा कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झालाच पाहिजे. यासाठी व्यापक आंदाेलन उभारण्याची गरज आहे.

Web Title: At the centre, the state has a Hindutva government remember; Warning of MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.