सांगलीत किती पाणीपातळीला कुठे येणार पूर?, महापालिकेकडून यादी प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 02:16 PM2024-07-25T14:16:29+5:302024-07-25T14:17:15+5:30
नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे
सांगली : अनेकदा महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांच्या डोईवर पुराचा धोका निर्माण झाला आहे. अद्याप परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोयना धरण क्षेत्रातील पावसावर पुराचे गणित अवलंबून आहे. सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेने कृष्णा नदीची पाणीपातळी आणि त्यानुसार बाधित होणाऱ्या लोकवस्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ पाणीपातळीचे मोजमाप दर्शविले आहे. महापालिका, पूर नियंत्रण कक्ष तसेच पाटबंधारे विभाग सातत्याने त्यावर लक्ष ठेवून आहे. सध्या सांगलीतील पाणीपातळी ३० फुटावर आल्याने पूर येण्यास सुरुवात झाली आहे. फुटागणिक लोकवस्त्या बाधित होणार आहेत. तरीही नदीपातळीत गतीने वाढ होत नसल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पाणीपातळी बाधित होणारे क्षेत्र
३० फूट - सूर्यवंशी प्लॉट
३१ इनामदार प्लॉट
३२.१ कर्नाळ रोड
३३.५ शिवमंदिर परिसर, बायपास चौक
३४ काकानगरसमोरील घरे
३५ दत्तनगर परिसर
३९ मगरमच्छ कॉलनी १
४० मगरमच्छ कॉलनी २
४१ मगरमच्छ कॉलनी ३
४२.५ मगरमच्छ कॉलनी ४ व ५
४३ सिद्धार्थ परिसर, राजीव गांधीनगर ते कदम घर
४४.५ भारतनगर पाटणे प्लॉट, हरीपूर रोड
४५.९ हरीपूर रोड क्रॉस, मारुती चौक
४६.६ व्यंकटेशनगरमागील भाग, आमराई, रामनगर
४८ टिळक चौक, मारुती रोड, आनंद थिएटर, अमरधामसमोरील रस्ता, कोल्हापूर रोड क्रॉस, शिवाजी मंडई, बापट बालसमोरील रस्ता, मीरा हौसिंग सोसायटी.
४८ मंगेश चौक, सांगलीवाडी, शामरावनगर, रामनगर, खिलारे प्लॉट, अपराध प्लॉट, विठ्ठलनगर, मॉडर्न कॉलनी
४९.६ पद्मा टॉकीज, वखार भाग
५० गुजराती हायस्कूल, धोबीघाट, ईदगाहसमोरील रस्ता, रिसाला रोड पोलिस लाईन पश्चिम बाजू
५५ गोकुळनगर, संजय गांधी झोपडपट्टी, भीमनगर, जुना बुधगाव रस्ता, रत्नाकर हौसिंग सोसायटी, गणेशनगर, अरिहंत कॉलनी, गणेश कॉलनी, पाकीजा मश्चिद, झुलेलाल चौक, शाहू उद्यान, बागडी गल्ली.
५७.६ कॉलेज कॉर्नर