अटलबिहारी वाजपेयीचा सागरेश्वर दौरा राहूनच गेला- सु. धो. मोहिते यांच्याकडून आठवणीला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:25 PM2018-08-17T22:25:04+5:302018-08-17T22:30:10+5:30
देशाचे माजी पंतप्रधान व तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी १४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्यांचे सांगलीतील सहकारी कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्या सत्कारानिमित्त सांगली दौऱ्यावर होते. यावेळी मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धो. म. मोहिते यांनी
प्रताप महाडिक
कडेगाव : देशाचे माजी पंतप्रधान व तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी १४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्यांचे सांगलीतील सहकारी कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्या सत्कारानिमित्त सांगली दौऱ्यावर होते. यावेळी मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धो. म. मोहिते यांनी अटलजींची भेट घेतली होती. यावेळी मोहिते यांनी सागरेश्वर अभयारण्याची सचित्र माहिती देऊन अटलजींना सागरेश्वर अभयारण्यास भेट देण्याची विनंती केली. वाजपेयी यांनीही अभयारण्यास यथावकाश भेट देण्याचे मान्य केले. त्यानंतर अल्पावधीत अटलजी पंतप्रधान झाले. पुढे मोहिते यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. परंतु ६ सप्टेंबर २००० रोजी धो. म. मोहिते यांचे निधन झाले आणि अटलजींची सागरेश्वर भेट राहुनच गेली.
१४ नोव्हेंबर १९९५ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्ण दिवसभराचा सांगली दौरा होता. दुपारी कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्या सत्कार समारंभासाठी अटलजी आले असताना वृक्षमित्र धो. म. मोहिते यांनी आपल्या काही सहकाºयांसमवेत अटलजींची भेट घेतली. त्यांच्याकडून अटलजींनी सागरेश्वर अभयारण्याच्या निर्मितीचा इतिहास ऐकला आणि मानवनिर्मित अभ्यायरण्यातील त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी धो. म. मोहिते यांनी अटलजींना सागरेश्वर अभयारण्यास भेटीचे निमंत्रण दिले. वाजपेयी यांनीही यशावकाश वेळ काढून अभयारण्यास भेट देण्याचे आश्वासन दिले. या दौºयानंतर अल्पवधीतच अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. पुढे धो. म. मोहिते यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. पण ६ सप्टेंबर २००० रोजी धो. म. मोहिते यांचे निधन झाले. त्यानंतर याबाबत पाठपुरावा झाला नाही.
सागरेश्वर अभयरण्यास अटलजींची भेट राहून गेल्याची खंत धो. म. मोहिते यांचे पुत्र रानकवी सु. धो. मोहिते यांनी व्यक्त केली.