कोकरूड येथे सापडले दुर्मिळ मोठ्या पतंगापैकी एक "एॅटलास मॉथ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:55 PM2020-09-23T14:55:05+5:302020-09-23T15:12:08+5:30

जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड येथे सापडले.येथील उपविभाग क्रमांक एक कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग काही काळ विसावले होते.

"Atlas Moth", one of the rare large moths found at Lamb | कोकरूड येथे सापडले दुर्मिळ मोठ्या पतंगापैकी एक "एॅटलास मॉथ"

कोकरूड येथे सापडले दुर्मिळ मोठ्या पतंगापैकी एक "एॅटलास मॉथ"

googlenewsNext
ठळक मुद्देकोकरूड येथे सापडले दुर्मिळ "एॅटलास मॉथ"जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक

विकास शहा

शिराळा - जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड येथे सापडले.येथील उपविभाग क्रमांक एक कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग काही काळ विसावले होते.

वसाहतीमधील कार्यालय प्रमुख प्रकाश लांडगे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कुतूहलाने त्याचे फोटोही काढले. नंतर वसाहतीमधील कु. मिनाजुल सरदार मुजावर , अभिजित सकटे यांनी गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" आहे हे समजले.

जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये "एॅटलस मॉथ" गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला "एॅटलास मॉथ" म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते.

सुरवंट (आळी) असतांनाच भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरतात. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जिव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.

८ इंच लांबीचे सर्वात मोठे पतंग

 दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" पतंग मादी असून साधारणपणे ८ इंच लांबीचे होते. हे पतंग विविध झाडांवर सुमारे २०० अंडी घालते. सोमवार दि.२१ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान हे पतंग पाहण्यास या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: "Atlas Moth", one of the rare large moths found at Lamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.