आत्मशक्ती पतसंस्थेस १ कोटी ४२ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:13+5:302021-04-08T04:27:13+5:30
पेठ : आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, पेठ या संस्थेच्या ठेवी, कर्जे, भागभांडवलात मोठी वाढ झाली आहे. पारदर्शक ...
पेठ : आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, पेठ या संस्थेच्या ठेवी, कर्जे, भागभांडवलात मोठी वाढ झाली आहे. पारदर्शक कारभार व ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर या वर्षात संस्थेला १ कोटी ४२ लाख ११ हजार रुपयांचा नफा झाला आहे. एकूण व्यवसाय २०० कोटी पूर्ण झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी दिली.
संस्थेचे संस्थापक स्व. हणमंतराव पाटील (बुवा) यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागात संस्था स्थापन होऊन शहरी भागात ठसा उमटविला आहे. संस्थेचे भागभांडवल ५ कोटी ३१ लाख, स्वनिधी ६ कोटी ५४ लाख, ठेवी ११४ कोटी १४ लाख, कर्जे ८६ कोटी ०२ लाख, एकत्रित व्यवसाय २०० कोटी १६ लाख झाला आहे. संस्थेच्या सात शाखा असून, कोअर बॅँकिंग प्रणाली सुरू आहे. लवकर मोबाईल बॅँकिंग सुविधा सुरू करीत असल्याची माहिती दिली.
यावेळी डॉ. अभिजित पाटील, उपाध्यक्ष अंबादास पेठकर, शेखर बोडरे, ज्येष्ठ संचालक प्रदीप पाटील, जनरल मॅनेजर संजय दाभाेळे यांच्यासह संचालक, अॅड. प्रमोद सांभारे, असि. जनरल मॅनेजर सुरेश पाटील, आदी उपस्थित होते.