विसर्ग वाढणार असल्याने शेतकऱ्यांत पुन्हा भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:09+5:302021-07-30T04:28:09+5:30
कोकरुड : वारणा नदीचे पाणी अजूनही पोटमळ्यात असताना पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या शेतीचे, पिकांचे नुकसान आणखी वाढणार ...
कोकरुड : वारणा नदीचे पाणी अजूनही पोटमळ्यात असताना पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या शेतीचे, पिकांचे नुकसान आणखी वाढणार आहे; त्यामुळे पंचनामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
पूरस्थिती कमी झाली असली तरी वारणा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पोटमळ्यात अजूनही पाणी असल्याने नदीकाठी असणारी पिके अद्यापही पाण्यात आहेत. सध्या चांदोली धरणातून ९७८० क्युसेक एवढा विसर्ग सुरू असताना, तो वाढवून तो १४९८० एवढा करण्यात येणार असल्याने पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. अगोदरच १० दिवसांच्या पुराच्या पाण्याने भात, मका, ऊस, भुईमूग, भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने उरलीसुरली पिकेही वाया जाण्याची भीती असून, पुन्हा पातळी वाढून आणखी काही दिवस पाणी राहिल्यास पंचनामेही रखडणार आहेत.