...शेवटी आटपाडी ग्रामपंचायतीला उत्तमरावच मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:09+5:302020-12-23T04:23:09+5:30

तब्बल सहा वर्षे आटपाडीत ग्रामसेवक म्हणून कर्तव्य बजावलेले उत्तमराव पाटील यांची पुन्हा येथेच बदली झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ...

... Atpadi Gram Panchayat finally got the best | ...शेवटी आटपाडी ग्रामपंचायतीला उत्तमरावच मिळाले

...शेवटी आटपाडी ग्रामपंचायतीला उत्तमरावच मिळाले

Next

तब्बल सहा वर्षे आटपाडीत ग्रामसेवक म्हणून कर्तव्य बजावलेले उत्तमराव पाटील यांची पुन्हा येथेच बदली झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ग्रामस्थांनी त्यांच्यावर अनेक कोट्या करून खास अभिनंदन केले आहे.

आटपाडीत राजकारण्यांना गावाच्या विकासापेक्षा स्वतःचे राजकारण अधिक महत्त्वाचे वाटत असल्याचे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले आहे. एकमेकांची जिरवाजिरवी करण्याचा प्रयत्न वारंवार सुरू असतो. त्यामुळे तालुक्यात ४४ ग्रामसेवक असताना आटपाडीत यायला कोणीच तयार होत नाही.

गेल्या तीन वर्षांत सहा ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. कोणी तिथे टिकू शकत नाही. मात्र, उत्तमराव पाटील याला अपवाद ठरले आहेत. यापूर्वीही सलग सहा वर्षे ते आटपाडीत होते. त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक कार्यक्रम झाले. उत्तरेश्वर यात्रा मोडकळीस आली होती; तिला नवे रूप देताना दरवर्षी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जात होता तेव्हा हेच उत्तमराव अनेकदा लावणीसम्राज्ञींना बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहन देत होते. त्यामुळे त्यांचे कलागुण आटपाडीकरांना चांगले ठाऊक आहेत.

चौकट

चौकशीची ऐशी की तैशी!

आटपाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत सध्या चौकशी सुरू आहे. यापूर्वी अनेकदा या ग्रामपंचायतीच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. अगदी ग्रामसेवक उत्तमराव पाटील यांचे एका जागेच्या नोंदीसाठीचे संभाषण असलेली ध्वनिफीतही व्हायरल झाली होती. तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती, पण आजपर्यंत कोणत्याच चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही.

कोट

मी सगळ्यांना एकत्र घेऊन निर्णय घेतो. सध्या सरपंच आणि सदस्य यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सरपंच आणि सदस्यांना विश्वासात घेऊन कायद्याने काम करणार आहे.

- उत्तमराव पाटील, ग्रामसेवक आटपाडी

फोटो -२२उत्तमराव पाटील

Web Title: ... Atpadi Gram Panchayat finally got the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.