आटपाडीत मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:40+5:302021-04-16T04:27:40+5:30
तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मका पिकाचे क्षेत्र मोठे आहे. रब्बी हंगामात चांगले उत्पन्न झाले आहे. व्यापारी मात्र शेतकऱ्यांना ...
तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मका पिकाचे क्षेत्र मोठे आहे. रब्बी हंगामात चांगले उत्पन्न झाले आहे. व्यापारी मात्र शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने मका खरेदी करून लुटत आहेत. याशिवाय प्रत्येक क्विंटलला एक किलो हवा आणि एक किलो पोत्याचे वजन असे दोन किलो वजन वजा केले जात आहे. यावर आता कोणतेही वजन कमी न करता आधारभूत किमतीने मका खरेदी करण्याची सोय आटपाडीत झाली आहे.
पणन मंडळाने रब्बी हंगामातील मका आणि ज्वारी हमीभावाने खरेदी करण्यासाठी आटपाडी बाजार समितीला खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ज्यांना मका आणि ज्वारी हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करायची आहे, त्यांनी ३० एप्रिलपर्यंत बाजार समितीत नाव नोंदणी करावी. त्यासाठी सातबारा, आठ 'अ' उतारा, आधार कार्ड झेरॉक्स आणि बँक पासबुक झेरॉक्स सोबत घेऊन येऊन नोंदणी करावी. त्यानंतर धान्य आणून जमा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी दिली.